गोळेगावच्या द्राक्षमहोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद

junnar
junnar

जुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली.19 फेब्रुवारी पर्यंत हा द्राक्ष महोत्सव सुरू राहणार असल्याचे जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.

या महोत्सवाचे उदघाटन एमटीडीसीच्या उच्च अधिकारी क्षिप्रा बोरा यांच्या हस्ते झाले. यावेळी एमटीडीसीच्या पुणे विभागीय कार्यालयाचे अधिकारी दिपक हरणे, माळशेज रिसॉर्टचे अधिकारी गाडेकर, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हडवळे, द्राक्ष उत्पादक जितेंद्र बिडवई, आदिनाथ चव्हाण, समीर जाधव, रामचंद्र काळे, मंगेश डोके आदी मान्यवर तसेच शेतकरी उपस्थित होते.  

मुंबई,पुणे आणि परिसरातून पहिल्या दिवशी पर्यटक असले होते. कोकणातून आलेले पर्यटक द्राक्षांनी लगडलेली बाग प्रथमच पहात होते. द्राक्ष महोत्सवात सहभागी झालेल्या पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांना जुन्नरविषयी, द्राक्ष शेतीविषयी माहिती देण्यात आली. सोबतीला ताज्या हीरव्या काळ्या द्राक्षांची चव चाखायला दिली गेली. द्राक्ष खाऊन झाल्यावर प्रत्यक्ष द्राक्ष बागेत फेरफटका तसेच बैलगाडीची रपेटही मारायला मिळाली, पर्यटकांनी द्राक्षांसोबत मनभरून फोटो काढले, आठवण अन गोड चवीची सोबत म्हणुन द्राक्ष विकत घेतली गेली. 

जितेंद्र बिडवई यांच्या जय्यत तयारीने पर्यटक एकदम खुश झाले. जुन्नरच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला. अभिजित रोकडे यांच्या वायनरीला भेट दिली. येथे अठरा प्रकारच्या वाइन त्यांना पहायला मिळाल्या. शेतकऱ्याच्या बांधावर येऊन, प्रत्यक्ष शेतातील द्राक्ष खायला मिळाली असा द्राक्ष महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवजयंतीला राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांना जुन्नरकरांची ही द्राक्ष महोत्सवाची अवीट पर्वणी ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com