कोरोनामुळे संधी वाढल्या; वाचा पुण्यातील 'इंटरव्ह्यू मोका' कंपनीची यशोगाथा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

अमित मिश्रा आणि सुजित करपे यांनी 2015 साली या कंपनीची स्थापना केली आहे. 50 देशांमधील पाचशेहून अधिक कंपन्यांना ते सेवा पुरवत आहेत. 60 कर्मचारी असलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल 12 ते 15 कोटी रुपये आहे.

पुणे : कोरोनानंतरच्या जगात डिजिटल बाबींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तांत्रिक सेवा पूरवणाऱ्या कंपन्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता असून त्याची प्रचिती बिबवेवाडी येथे असलेल्या 'इंटरव्ह्यू मोका' (Interview Mocha) या कंपनीच्या कोरोना काळातील उलढालीवरून येते. 

संगणक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ आणि ऑनलाइन व्हावी तसेच योग्य उमेदवार निवडला जावा यासाठी या कंपनीने इंटरव्ह्यू मोका हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाते. जवळपास दोन हजार प्रकारच्या कामांसाठी या सॉफ्टवेअरमध्ये एक लाख प्रश्न आणि विविध सुविधा आहेत. त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या टेस्टवरून कंपनीला योग्य उमेदवार निवडणे सोपे होते.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

Image may contain: 2 people, outdoor

अमित मिश्रा आणि सुजित करपे यांनी 2015 साली या कंपनीची स्थापना केली आहे. 50 देशांमधील पाचशेहून अधिक कंपन्यांना ते सेवा पुरवत आहेत. 60 कर्मचारी असलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल 12 ते 15 कोटी रुपये आहे. कोरोनाचा कंपनीवर नेमका काय परिणाम झाला याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मिश्रा यांनी सांगितले की, "लॉकडाऊनमध्ये सुरुवातीचे काही दिवस कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यात अडचणी येत होत्या. मात्र पुरेशी सुविधा दिल्यानंतर ती अडचण दूर झाली.

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

जगभर कोरोनाचा फैलाव झाल्याने मार्च-एप्रिलमध्ये व्यवसाय अगदी 45 टक्‍क्‍यांवर आला होता. कारण अनेक कंपन्यांनी कामगार भरती थांबवली होती. तसेच प्रशिक्षण देण्यात आलेले कौशल्य त्यांनी अवगत केली की नाही याची तपासणी देखील होत नव्हती. मात्र आता परिस्थिती सुरळीत झाल्याने कंपन्यांना पुन्हा कर्मचाऱ्यांची गरज भासू लागली आहे. पण मुलाखतीसाठीची प्रक्रिया आता समोरासमोर बसून घेणे शक्य नाही. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आम्हाला असलेली मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

विद्यार्थ्यांनो, सीए परीक्षेची तयारी करताय? वाचा महत्वाची बातमी

ग्राहकांच्या अपेक्षाही वाढल्या : 
आमचा व्यवसाय हा पूर्णतः तांत्रिक बाबींवर अवलंबून आहे आणि आता जगाला या गोष्टींची गरज आहे. त्यामुळे आपण स्वतःत नेहमी बदल करत राहिलो आणि परिस्थितीचा अंदाज आला, तर कमी अडचण येते. सध्या ग्राहकांच्या अपेक्षा देखील वाढल्या असून मुलाखतींचे तांत्रिक अहवाल त्यांना हवे असतात. तसेच अनेक बदल देखील त्यांच्याकडून सुचवण्यात येत आहेत, असे मिश्रा यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तरलो आणि वाढलो देखील :
कोरोनाच्या परिस्थितीमुळे आम्ही खर्चात वीस टक्क्यांपर्यंत कपात केली होती. आम्ही सेवा पुरवत असलेल्या अनेक कंपन्यांचे या काळात नुकसान झाले. मात्र आमच्या सॉफ्टवेअरला मागणी वाढत आहे. यापुढे देखील मागणी वाढतच जाणार असून त्यातून कंपनीची उलाढाल वाढेल, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good times has brought to the Interview Mocha company at Bibwewadi after corona pandemic