अंत्यविधीसाठी करू नका धावपळ; 'मोक्ष सेवा' मिळणार एका कॉलवर!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

- 'गुरुजी ऑन डिमांड' संस्थे मार्फत अंत्यविधीसाठी 'मोक्ष सेवा' सुविधा
- मोक्ष सेवा अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य पुरवण्याचे कार्य

पुणे : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अंत्यविधीसाठी धावपळ करावी लागते. त्यात बहुतांश वेळी लागणारे साहित्य मिळवणे नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरते. तर कधी ऐनवेळी गुरुजीच मिळत नाहीत.

आता या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून 'गुरुजी ऑन डिमांड' या संस्थेमार्फत मोक्ष सेवा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा पुरविण्यात येत आहेत.

- मागासवर्गीय, आदिवासी शेतकऱ्यांना 'या'साठी मिळणार अडीच लाखाचे अनुदान!

या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे संचालक अक्षय चावरे म्हणाले, "संस्थेमार्फत मागील एक वर्षापासून जन्म सोहळ्यापासून ते अंत्यविधीपर्यंत सर्व प्रकारची सेवा पुरविण्याचे कार्य करत आहोत. यामध्ये सुमारे 600 नागरिकांना सेवा पुरविण्यात आली. परंतु लॉकडाऊनमुळे सध्या नागरिकांना अंत्यविधी कार्य करताना अनेक अडचणींच्या सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी आम्ही 'मोक्ष सेवा' या उपक्रमाची सुरुवात १ जूनपासून केली.

- दरमहा 10 हजार स्टायपेंड अन् मोफत प्रशिक्षणही; तरुणांसाठी आहे रोजगाराची संधी!

तसेच मोक्ष सेवेअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तूंपासून गुरुजींपर्यंत सर्व काही उपलब्ध करून देत आहोत. यासाठी संस्थेमार्फत सुमारे 600 गुरुजींची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच 'मोक्ष सेवे' अंतर्गत या पंधरा दिवसांमध्ये 45 नागरिकांना अंत्यविधीसाठी लागणारी सेवा पुरविण्यात आली आहे."

आणखी वाचा - लॉकडाउनमुळं पिकात केला बदल, आता खेळतोय लाखात

संस्थेतर्फे 'मोक्ष सेवा' सर्व नागरिकांसाठी 24 तास सुरू असते. तसेच या कामी पोलिसांचे देखील सहकार्य मिळत असल्याचे चावरे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 9552007877 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन 'गुरुजी ऑन डिमांड' या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Image may contain: text that says "मोस सेवी अंत्यविधींसा लागणारी सेवा, आता मिळेल 24 तास हेल्पलाईन क्रमांक +91 9552007877 सुविधा पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरासाठी उपलब्ध GOD Guruji on Demand"

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goods and services required for the funeral are being provided through Guruji on Demand