"कॉंग्रेसकडूनच विकासाचा पाया' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे - ""भारतीय जनता पक्ष विकासाच्या ज्या गप्पा मारत आहे, त्याचा पाया कॉंग्रेसने घालून दिला आहे,'' अशी टीका अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी मंगळवारी केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात कॉंग्रेसच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त केली. कॉंग्रेसने पुण्याच्या विकासासाठी काहीच केले नसल्याची दूषणेही त्यांनी भाषणातून दिली. या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात तिवारी यांनी ही टीका केली आहे. 

शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प कॉंग्रेसने केले आहेत. रस्त्यांपासून मेट्रोपर्यंत आणि धरणांपासून पाणीपुरवठ्याच्या योजनांपर्यंतचे प्रकल्प कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालीच साकारले गेल्याचे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Web Title: gopal tiwari in pune