esakal | पडळकर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक; आमदार अमोल मिटकरींची जोरदार टीका
sakal

बोलून बातमी शोधा

mitkari padalkar

आमदार पडळकर यांनी पहाटे साडेपाच वाजता गडावर येऊन पुतळा अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता.

पडळकर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक; आमदार अमोल मिटकरींची जोरदार टीका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते श्री. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचा जेजुरीच्या खंडोबा गडाच्या पायरी मार्गावरील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र त्यापुर्वीच आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता काही कार्यकर्त्यांच्या समवेत भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती पोलिसांना वेळेत कळाल्यामुळे त्यांनी हा घटनाक्रम थांबवला. 

यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, गोपीचंद पडळकर म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. महाभारतात शिशुपाल जसा चुका करत होता त्याचप्रमाणे चुका करत करत गोपीचंद पडळकर स्वत:ला आपण किती शहाणे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यापूर्वी चोरासारखा जावून स्वत: मी कसा समाजाचा प्रतिनिधी आहे, असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, जो बिरोबाची शपथ घेऊन समाजाला भूलवू शकतो. ज्यामुळे बारामतीसारख्या मतदार संघात डिपॉसिट जप्त होतं. अशी व्यक्ती पवार साहेबांवर आज वारंवार चिखलफेक करते आहे. आता भाजपला पणवती लागलेली आहे. पवार साहेबांवर बरळणाऱ्या या वाचाळवीरांनी तोंडाला आवर घालावा, अन्यथा महाराष्ट्रातील जनता योग्यवेळी उत्तर देईल. 

हेही वाचा - शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल

आमदार पडळकर यांनी पहाटे साडेपाच वाजता गडावर येऊन पुतळा अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखले आहे. त्यांनी दुरुनच भंडारा उधळून घोषणा दिल्या. त्यानंतर ते तिथून निघून गेले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी पवार हे महाराष्ट्र लागलेला शाप आहे, असे वक्तव्य केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर सडकून टीका केली. पडळकर यांचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. ज्यांचे निवडणुकीत प्रमुख पक्षाचे उमेदवार असूनही डिपॉझिट जप्त झाले, अशांना जास्त महत्त्व देऊ नये. ज्यांना लोकांनी नाकारले, त्यांची एवढी काय नोंद घेता? त्यांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही.' अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचा समाचार घेतला.