साडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. 

लसीकरणामुळे सुरवातीला देवी रोगाचे देशातून निर्मूलन केले. त्या पाठोपाठ आता आपण पोलिओचेही निर्मूलन केले. गोवर आणि रुबेला हे आजार आटोक्‍यात आणण्यासाठी सध्या ‘एमआर’ लसीकरण सुरू आहे. हे आजार होऊच नये आणि झालेच तर त्यांची तीव्रता कमी व्हावी म्हणून लसी दिल्या जातात. राज्यात २७ नोव्हेंबरपासून हे लसीकरण सुरू झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ही लस दिली जात आहे. 

लसीकरणाबाबत बोलताना भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘‘बाळ नऊ महिन्यांचे झाल्यावर गोवर (मीझल्स), गालगुंड (मम्प्‌स) आणि रुबेला या तीनही आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी ‘एमएमआर’ ही एकत्रित लस दिली जाते. गोवर आणि रुबेला या दोन आजारांविरुद्ध ९ महिने ते १५ वर्षे वयाच्या मुला-मुलींना ‘एमआर’ ही लस देण्याची मोहीम सध्या सुरू आहे. गोवर हा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. रुबेला हा आजार गर्भवतींना पहिल्या तीन महिन्यांत होण्याचा धोका असतो. त्याचा दुष्परिणाम थेट गर्भावर होतो. गर्भाच्या डोक्‍याचा आकार कमी होणे, मतिमंदत्व, मोतीबिंदू, बहिरेपणा आणि हृदयाचे आजार त्यातून उद्भवतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही लस अत्यावश्‍यक आहे.’’

हे आजार आटोक्‍यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असते. लसीकरणाचे प्रमाण सातत्याने ८३ ते ९४ टक्के असावे लागते. जबाबदारी म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांना ही लस आवर्जून द्यावी, असे आवाहनही डॉ. जोग यांनी केले आहे.

लस सुरक्षितच
‘एमआर’ लस देणे सुरक्षित आहे. या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लसीकरणाशी संबंधित सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ प्रशिक्षित आहे. पालकांनी आपल्या मुलांना ही लस निःशंकपणे द्यावी. अनेक राष्ट्रांमधून गोवर, रुबेला हे आजार हद्दपार होत आहेत. त्यात आपल्याला मागे राहून चालणार नाही, असेही बालरोगतज्ज्ञ डॉ. जोग यांनी सांगितले.

शहरातील एक हजार ३२० पैकी ७९७ शाळांमधील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यातून तीन लाख ३९ हजार ८१९ विद्यार्थ्यांना लस दिली आहे.
- डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

Web Title: Govar Rubela Vaccine Student