"कोरेगाव-भीमा'ची पुनरावृत्ती प्रशासनाने टाळावी -  आनंदराज आंबेडकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे - कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी जनतेचे गेल्या वर्षी स्थानिकांच्या अचानक बंदमुळे मोठे हाल झाले होते. त्यामुळे गतवर्षीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावी. गेल्या वेळी ज्या गावगुंडांनी उपद्रव माजवला होता, त्यांना पोलिसांनी अटक करावी; अन्यथा कोरेगाव-भीमा येथे यंदाही दंगल घडू शकते, अशी भीती रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

""रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी दरवर्षी जाहीर सभा घेतली जाते. यंदा सरकारने अद्याप आम्हाला परवानगी दिलेली नाही; परंतु परवानगी दिली नाही तरी आम्ही हा कार्यक्रम घेणार आहोत. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सरकार जबाबदार असेल,'' असा इशाराही आंबेडकर यांनी दिला. 

ते म्हणाले, ""कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारी रोजी राज्यभरातून आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने येणार आहे. हे लक्षात घेता सरकारने त्या ठिकाणी पाणी, वाहतूक, स्वच्छतागृहांची व्यवस्था तसेच सपाटीकरण करावे. विजयस्तंभ सुशोभित करावा, पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवावा. मागील वर्षी पुरेसा बंदोबस्त नसल्यामुळे दुर्घटना घडली होती. त्यामुळे विजयस्तंभ परिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावे.'' 

इंदू मिलमध्ये "स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. स्मारकासाठी सरकारकडे पैसा नसेल तर, ती जमीन आमच्या ताब्यात द्यावी. आंबेडकरी जनता त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभारेल. 
- आनंदराज आंबेडकर, अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना 

Web Title: The govenor should not repeat Koregaon-Bhima says anandraj ambedkar