4 राज्यातील हिंसाचाराला सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार -प्रकाश आंबेडकर

उमेश शेळके
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत देशात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या संपला प्रतिसाद मिळाला, या बंदमध्ये काहींचा बळी देखील गेला असून त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आणि सुप्रीम कोर्ट आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी प्रकाश आबेंडकर म्हणाले की,सोशल मीडियावर आज भारत बंद बाबतचा मेसेज व्हायरल झाला. त्या बंद ला देशभरात प्रतिसाद मिळाला. मात्र त्या दरम्यान काही ठिकाणी हिंसा देखील घडली असून यावेळी काही नागरिकांचा बळी देखील गेला आहे. या सर्व घटनेला सुप्रीम कोर्ट आणि सरकार जबाबदार आहे. या गंभीर परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

ते पुढे म्हणाले की, देशातील सद्य स्थिती लक्षात घेता आपल्या देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही. तर या सर्व घडामोडी देशातील अनेक भागात घडत असताना कोरेगाव भिमा दंगल प्रकरणातील मिलिंद एकबोटे यांना अटक केली मात्र अद्याप पर्यँत संभाजी भिडे यांना अटक केली नाही. त्यातून हे सरकार अशा व्यक्तींना पाठिशा घालण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

Web Title: government and supreme court are responsible for today's violence says prakash ambedkar