आंबेगाव-शिरूर येथील गावात नळयोजनेसाठी २८ कोटी किंमतीच्या कृती आराखड्यास शासनाची मंजुरी 

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 26 जुलै 2018

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एकूण २८ कोटी १५ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या कृती आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. येत्या दोन वर्षात सर्व योजना मार्गी लागतील. या गावातील व वाडी वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे.

मंचर : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील ५३ गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एकूण २८ कोटी १५ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या कृती आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. येत्या दोन वर्षात सर्व योजना मार्गी लागतील. या गावातील व वाडी वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, 'नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबन लोणीकर यांना विनंती करण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार  आंबेगाव तालुक्यातील ३८ योजनांना सोळा कोटी ५४ लाख ६६ हजार रुपये व शिरूर तालुक्यातील १५ योजनांना ११ कोटी ६० लाख ६४ हजार रुपयांच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.'

नळ योजना गावे व मंजुरी रक्कम -
आंबेगाव तालुका- आंबेदरा -३६ लाख ८१ हजार रुपये, आसाने- जांबळेवाडी वीस लाख वीस हजार रुपये, अवसरी खुर्द –अभंगमळा ४४ लाख ७२ हजार रुपये,अवसरी खुर्द- कराळेवाडी ३४ लाख ४२ हजार, भागडी- ३८ लाख ४८ हजार, भराडी-५९ लाख ८० हजार,चांडोली खुर्द- ९९ लाख ५६ हजार रुपये, एकलहरे- ५५ लाख रुपये, जांभोरी- नांदूरकीचीवाडी- सोळा लाख रुपये, जारकरवाडी- कापडदरा, बढेकरमळा ५० लाख रुपये, जवळे- ८२ लाख सोळा हजार रुपये, काळेवाडी-दरेकरवाडी- गवारवाडी- ९२ लाख ९० हजार रुपये,कानसे- ६९ लाख दहा हजार रुपये, कारेगाव-कराळेवस्ती- २३ लाख ९२ हजार रुपये, खडकी-पुर्नवसन- ४२ लाख रुपये, कोंढवळ ३५ लाख ३६ हजार रुपये, कोळवाडी कोटमदरा पानसरेवाडी- ५६ लाख ६४ हजार रुपये, लोणी- ४० लाख ५६ हजार रुपये, मांदळेवाडी- एक कोटी ३५ लाख वीस हजार रुपये रुपये, मेघोली- १५ लाख रुपये, निरगुडसर-बेलसरवाडी २९ लाख ६४ हजार रुपये, पहाडदरा- ठाकरवाडी- १७ लाख ५० हजार रुपये, पंचाळे बुद्रुक- खुर्द- १९ लाख रुपये, पारगाव तर्फे खेड- पावले वस्ती सावंतवाडी- ३३ लाख ५३ हजार रुपये, फलोदे- मुदगुनवस्ती- १८ लाख वीस हजार रुपये, पिंपळगाव तर्फे घोडा -पोखरकरवाडी- ४३लाख ६८ हजार रुपये, पोंदेवाडी- रोडेवाडी- सोळा लाख रुपये, शेवाळवाडी- ५० लाख रुपये, शिंगवे- माळीमळा, डोकेमळा, येदमळा- तीस लाख रुपये, शिनोली- ३५ लाख रुपये, सुपेधर- १५ लाख रुपये, टाकेवाडी- ३४ लाख ६५ हजार रुपये, तळेकरवाडी- ३५ लाख २१ हजार रुपये, ठाकरवाडी- ४३ लाख रुपये, थोरांदळे- ५७ लाख वीस हजार रुपये, थुगाव- ५२ लाख रुपये, तिरपाड- १४ लाख तीस हजार रुपये, वळती- ६२ लाख ९२ हजार रुपये, 

शिरूर तालुका-
कवठेयमाई - गांजेवस्ती- १८ लाख ८५ हजार रुपये,हिलालमळा- ४० लाख रुपये, मालवडेवस्ती- ४० लाख रुपये, मंजाळवाडी- ४५ लाख रुपये, मलठण-दंडावतेदरा- साठ लाख रुपये, मिडगुलेवाडी- एक कोटी १८ लाख ३६ हजार रुपये, निमगावदुडे- चाणखानबाबवस्ती- २९ लाख ३२ हजार रुपये,पिंपरखेड- बोंबेमळा, दाभाडेमळा, दत्तवाडी, ढोमेवाडी,पोखरकरवस्ती, मधलामळा- एक कोटी तीस लाख वीस हजार रुपये, पिंपरखेड-बोर्हाडेमळा- १५ लाख ७१ हजार रुपये, रावडेवाडी- मुजावरवस्ती-तीस लाख रुपये,सविंदने- ५८ लाख रुपये, टाकळहाजी होणेवाडी- ३५ लाख ३७ हजार रुपये, टाकळहाजी-बापूसाहेबनगर- २४ लाख ४३ हजार रुपये, हिवरे- दिवानमळा- २४ लाख ९० हजार रुपये, कारेगाव- चार कोटी ९० लाख ५० हजार रुपये.   

Web Title: Government Approves Action Plan of Rs 28 Crore for pipe connection in AmbegaonShirur