सावित्रीच्या लेकींची समाजकार्यात "रोशनी' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - एकीच बळ नृत्यशैलीत अन्‌ दुसरी सामाजिक कार्यात रमलेली... एक नृत्य कलेतून संतविचार पोचविणारी अन्‌ दुसरी अपंगत्वावर मात करत वंचित मुलांच्या शिक्षणासाठी झटणारी... दोघीही वेगळ्या पण त्यांच्यासारख्या इतर युवतींसाठी प्रेरणादायी अशाच. नेहा भाटे आणि दीक्षा धिंडे यांची ही यशोगाथा... दोघींच्या या यशाला आता राज्य सरकारच्या युवा पुरस्काराची कौतुकरूपी थाप मिळणार आहे. 

पुणे - एकीच बळ नृत्यशैलीत अन्‌ दुसरी सामाजिक कार्यात रमलेली... एक नृत्य कलेतून संतविचार पोचविणारी अन्‌ दुसरी अपंगत्वावर मात करत वंचित मुलांच्या शिक्षणासाठी झटणारी... दोघीही वेगळ्या पण त्यांच्यासारख्या इतर युवतींसाठी प्रेरणादायी अशाच. नेहा भाटे आणि दीक्षा धिंडे यांची ही यशोगाथा... दोघींच्या या यशाला आता राज्य सरकारच्या युवा पुरस्काराची कौतुकरूपी थाप मिळणार आहे. 

नेहा ही भरतनाट्यम्‌मधून संत विचार पोचविणारी नृत्यांगना अन्‌ दीक्षा ही अपंगत्वावर मात करून वंचितांच्या हक्कासाठी लढणारी युवा कार्यकर्ती. दोघींचीही ओळख व कार्यक्षेत्र वेगळे असले, तरी त्यांच्या कामाला युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महिला दिनानिमित्त दोन कर्तृत्ववान युवतींशी साधलेला हा संवाद. 

दीक्षा धिंडे हिला जन्मतःच अपंगत्व आले तरीही कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे ती खंबीरपणे उभी राहिली. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक कार्यासाठी स्वतःला झोकून देण्याचे तिने ठरवले आणि "रोशनी' संस्थेतून वंचितांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. याची दखल म्हणून तिची संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा राजदूतपदी निवड झाली. त्याअंतर्गत ती आज वयाच्या 23 व्या वर्षी अपंगत्व असूनही जागतिक पातळीवर शैक्षणिक बदलांसाठी आणि वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहे. तिला 2015-16 चा पुणे विभागातील युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

याबाबत दीक्षा म्हणाली, ""युवा पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे. पण, फक्त स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करण्यापेक्षा त्यासाठी प्रत्यक्षात काम सुरू करा. तसेच, वंचित मुलांसाठी परिपक्व योजना राबवाव्यात.'' 

नृत्यात रमलेल्या 30 वर्षीय नेहा भाटे हिने उमा टिळक यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून तिने भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिला 2014-15 चा पुणे विभागातील युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री संत सेवा संघाचे संजय गोडबोले यांच्या संपर्कात आल्यानंतर तिचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तिने संतविचार व वाङ्‌मय नृत्यातून पोचविण्याचे कार्य सुरू केले. 

नेहा म्हणाली, ""आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. संतविचार आणि जीवनमूल्ये तरुणांपर्यंत पोचण्यासाठी मी नृत्यातून प्रयत्न करत आहेत. त्याची दखल सरकारने घेतली याचा आनंद आहे.'' 

Web Title: The government declared a state youth award