सरकारकडून अघोषित आणीबाणी - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

पुणे - ‘भाजप व मित्रपक्षांच्या राजवटीत अघोषित आणीबाणीचे वातावरण आहे. पूर्वीची आणीबाणी परवडली, पण आत्तासारखी परिस्थिती नको. पैशाचं राजकारण चाललंय. पदवीधर मतदारसंघातही मते विकली जात आहेत.

कोणाच्या मागून जावे, असे आशादायक चित्र दिसत नसल्याने धर्मनिरपेक्ष विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांच्याविरोधात मुकाबला केला पाहिजे,’’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.   

तिसऱ्यांदा विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. डॉ. बाबा आढाव, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, न्या. प्रकाश परांजपे, सुभाष वारे, डॉ. अभिजित वैद्य, सुशीला मोराळे, अल्लाउद्दीन शेख, प्रभाकर नारकर उपस्थित होते. 

शेट्टी म्हणाले, ‘‘मी काही काळ सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेलो होतो; पण मी बाजूला झालो. तसे केले नसते तर माजी खासदार म्हणून माझी ओळख झाली असती.’’ डॉ. आढाव, पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: government emergency raju shetty politics