सरकारी कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे : सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे कर्मचारी संघटनेने येत्या 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. विविध आंदोलनामुळे सध्या वातावरण तापले आहे. सरकारने आंदोलनापूर्वीच चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे. 

संघटनेचे राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष रमेशभाई आगावणे, जिल्हाध्यक्ष मदार शेख, यांत्रिकी जिल्हाध्यक्ष बबलू शेख यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. शासकीय आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. सातवा वेतन आयोग, थकीत महागाई भत्ता, कर्मचारी भरती, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर रजा, अनुकंपा नियम दुरुस्ती, अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, आरोग्य खात्यातील परिचरांना किमान वेतन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, आदी मागण्यांसाठी तीन दिवसांच्या संपावर जात असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. 

Web Title: Government employees on strike for three days