पुण्याची पाणीकपात हे सरकारचे अपयश - अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील पाणीकपातीचा प्रश्‍न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय घेणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळेच शहरावर ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराचा पाणीपुरवठा 1350 एमएलडीवरून 650 एमएलडीवर आणला आहे. त्यामुळे पुणे शहराला सध्याच्या तुलनेत निम्मेच पाणी मिळणार आहे. 

यासंदर्भात पवार म्हणाले, ""पालकमंत्री तसेच जलसंपदा विभागासह महापालिका यांनी शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्यापासूनच पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते. धरणातील पाणीसाठा, बाष्पीभवन, जुलैपर्यंत पाणी कसे पुरेल याचे नियोजन करणे अपेक्षित होते. नागरिकांनीही पाण्याची काटकसर करणे आवश्‍यक आहे. असे असले तरी नागरिकांना पुरेसे पाणी देणे क्रमप्राप्त आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणामुळे शहरावर पाण्याचे संकट ओढवल्याचा आरोप पवार यांनी केला.'' 

Web Title: Government failure of water reduction in Pune says ajit pawar