सरकार फसवे असल्याची गुरव समाजाची भावना - आण्णासाहेब शिंदे

चिंतामणी क्षीरसागर 
मंगळवार, 22 मे 2018

वडगाव निंबाळकर (पुणे) : हिंदुत्ववादाचा झेंडा मिरवणारे भाजपाचे सरकार देवस्थानातील पुजाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणु पहात आहे. संख्यने कमी असलेल्या गुरव समाजावर अनेक ठिकाणी आन्याय होत आहे. देवस्थानच्या जमिनीवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. देवदेवतांच्या नावाचा मतासाठी वापर करून सत्ता मिळवणाऱ्या सरकारने पुजाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे सरकार फसवे असल्याची भावना गुरव समाजाची झाली असल्याचे मत राज्य गुरव संघटनेचे अध्यक्ष अॅड. आण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे गुरव समाजातील गुणवंताचा सत्कार आणि वधुवर परिचय मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा तोरडमल, संतोष वाघमारे, कैलास गुरव, प्रविण राजगुरू, भाग्यश्री भालेराव, धनंजय दरे, शंकर शिर्के, योगेश पोरे, रंगनाथ गुरव, शिवाजी साखरे, बाळासो चौधरी, महेंद्र साळुंके, उमेश गुरव, प्रभाकर निलकंठ ज्योती गाडे, सुर्यकांत गुरव उपस्थीत होते. शिंदे पुढे म्हणाले की देवाची पुजा आर्चा करून आपली उपजिवीका चालवणाऱ्या गुरव समाजाच्या अनेक समस्यांबाबत सरकारदरबारी पाठपुरावा केला. पण काहीच उपयोग झाला नाही.

सरकार केवळ आश्वसन देउन बोळवन करीत आहे. हिंदुच्या पवित्र मंदिरातील पुजारी सरकारच्या काळात असुरक्षीत आहे. अनेक ठिकाणी आन्यायकारक निर्णय होतात. याबाबी सरकारच्या निदर्शनास आनुन दिल्या आहेत. मुस्लीम समाजातील मदरशांना पगार देणारे सरकार हिंदु देवळातील पुजाऱ्यांना पगार तर सोडा पण हक्क हिरावुन घेत आहे. यामुळे सरकार फसवे आहे. याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येउन लढा उभारला पाहीजे सभेत हात उंचावुन सर्वांची सहमती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सरिता गुरव सुत्रसंचालन गणेश गुरव, आभार पांडुरंग गुरव यांनी मानले.

Web Title: government is Fraudulent feels gurav community said by annasaheb shinde