कर्नाटकात सरकार कोसळले; मंचरमध्ये आनंदोत्सव...

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 19 मे 2018

मंचर (पुणे) : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा विश्वासदर्शक ठरवला सामोरे जाण्याच्या अगोदरच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजप सरकार कोसळल्यामुळे आज (शनिवार) मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.

दिवसभर विश्वासदर्शक ठराव मंजूर होणार किंवा नाही? याबाबत नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कर्नाटक विधी मंडळातील थेट प्रक्षेपणाची दृश्य नागरिक टीव्ही समोर बसून पाहत होते. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर मंचर येथे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, काँग्रेसचे जेष्ठ नेते कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, राजेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकत्र जमले. त्यांनी शरद पवार, सोनिया गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण थोरात, अॅड. राहुल पडवळ, संजय चिखले, अजय घुले, संजय काळे, खलीद इनामदार, गोकुळ बाणखेले, मल्हार शिंदे, राहुल टेमकर आदी कार्यकर्त्यांनी पेढे वाटले.

Web Title: Government in Karnataka collapses Carnival in Manchar