सरकारने शिक्षणासाठी भरीव तरतूद करावी - मनीष सिसोदिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

शिक्षणाच्या माध्यमातून दहशतवाद आणि हिंसा संपविता येते. त्यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरमध्ये सुधारणा करून, तेथे ४४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- मनीष सिसोदिया

कोथरूड - देशातील सर्वच राज्यांतील सरकारी शाळेतील पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारच्या असतील असे नाही. आमच्या शिक्षण व्यवस्थेत विरोधाभास असल्याचे जाणवते. विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमधून उत्तम प्रकारचे शिक्षण द्यावयाचे असेल, तर केंद्र व राज्य सरकारने अंदाजपत्रात शिक्षणावरील खर्चात भरीव तरतूद करावी, असे मत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या पंधराव्या तुकडीच्या प्रारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. खासदार ॲड. पिनाकी मिश्रा व शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. एस. परशुरामन, डी. पी. आपटे, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, प्रा. डॉ. शैलश्री हरिदास आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government should make adequate provision for education Manish Sisodia