शासनाने तमाशा कलावंतांप्रमाणेच भारुड कलाकारांनाही मानधन द्यावे

नायफड (ता. खेड) : येथे सुपे मेमोरियल फौंडेशनच्या वतीने भारूडातील कलाकारंना आर्थीक मदतीचा हात.
नायफड (ता. खेड) : येथे सुपे मेमोरियल फौंडेशनच्या वतीने भारूडातील कलाकारंना आर्थीक मदतीचा हात.

चास - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र भिती असताना अनेक स्थानिक कलाकारांवर उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे, शासनाने तमाशा कलावंतांप्रमाणेच भारुड कलाकारांनाही मानधन द्यावे व त्यांना आर्थिक मदत द्यावी तरच ही मंडळी स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतील. असे प्रतीपादन सुपे मेमोरियल फौंडेशनच संस्थापक डॅा. संतोष सुपे यांनी नायफड (ता. खेड) येथे भारूडातील कलाकारांना मदतीचा हात देताना व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगभरात आदिवासींना माणूस म्हणून सन्मान मिळावा, त्यांची पिळवणूक थांबावी, आदिवासी संस्कृती, बोलीभाषा, परंपरा, वेशभूषा व अन्नसंस्कृती टिकवून रहावी, आदिवासींचे कुपोषण व विस्थापन थांबावे. यासाठी नऊ ऑगष्ट या आदिवासी दिनाचे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 45 आदिवासी जमाती हा सण अतिशय उत्साहाने साजरा करून आपल्या कला, नृत्य, भारुड, संस्कृती, परंपरा, वेशभूषा व कलेचे प्रदर्शन करतात व निसर्गाचे पूजन करतात. मात्र, चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच कार्यक्रमावर गदा आली असून व्यवसायही बंद आहेत.

आदिवासी भारुड संस्कृती व कलेचे प्रदर्शन ग्रामीण भागामध्ये गावोगावी ग्रामदैवतांच्या जत्रांमध्ये करणाऱ्या कलाकारांचा कोरोणा सारख्या महामारी मध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक गावांच्या जत्रा बंद पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने एस. एम. सुपे मेमोरियल फाउंडेशन, पुणे यांनी भारूडातील कलाकारांना मदतीचा हात देण्यासाठी माळेवाडी नायफड येथील श्री कमलजादेवी कलापथक मंडळ व धामणगाव मदगेवाडी येथील श्री गणेश कला नाट्य मंडळ या भारुड मंडळाचा व कलाकारांचा सत्कार करून आर्थीक मदत देण्यात आली.

याप्रसंगी डॉ.संतोष सुपे, श्री कमलजादेवी कलापथक मंडळ, माळेवाडी नायफड यांचे अध्यक्ष अनिल दवणे, काळूराम तिटकारे, सुदाम माळी, रघुनाथ कावळे, शंकर माळी, मुरलीधर माळी, योगेश दवणे, विशाल माळी हे उपस्थित होते. तसेच श्री गणेश कला नाट्य मंडळ धामणगाव मदगेवाडी यांचे अध्यक्ष मनोहर मदगे व देवराम मदगे, ज्ञानेश्वर मदगे, चिमाजी मदगे, लक्ष्मण मदगे, नामदेव वाजे उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, श्री सुदाम मदगे यांनी केले आभार राजू मदगे यांनी मानले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com