शासनाने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवी : हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
रविवार, 3 जून 2018

वालचंदनगर : शासनाने शेतकऱ्यांची सुरु असलेली पिळवणूक थांबवून दुधाळा २७ रुपये दर व सहा रुपये अनुदान देण्याची  मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

राज्यामध्ये १ जून पासुन शेतकऱ्यांनी संप पुकारला अाहे. यासंदर्भात पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा राहणार आहे.  सध्या दुधाचे दर कमी झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करणे अवघड झाले आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला अाहे. दुग्ध व्यवसाय हा कष्टाचा व्यवयास असुन शेतकऱ्यांना केलेल्या कष्टाचे दाम मिळणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांना शासनाने किमान २७ रुपये प्रतिलिटर  दर द्यावे. तसेच ६ रुपये प्रतिलिटर अनुदान जाहिर करावे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना भाजीपाल्याची काढणी करुन वाहतुक करणे ही परवडत नसल्यामुळे भाजीपाला रस्त्यावर फेकुन देण्याची वेळ येत आहे. भाजीपाल्याला ही हमी भाव देण्याची गरज आहे.

शासन शेतकऱ्यांची सर्वबाजुंनी कोंडी करीत असुन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करुन पिळवणूक थांबवण्याची मागणी केली. यावेळी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील युवकांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेेट घेवून त्यांना शेतकऱ्यांची विविध मागण्या सांगितल्या. यावेळी पाटील यांच्याकडे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्या शासन  दरबारी मांडण्यासाठी निवदेन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ उपस्थित हाेते.

Web Title: government should stop exploitation by farmers: harshvardhan patil