शासनाने दारात नाही तर प्रसंगी घरात जाऊन काढले आधार कार्ड

राजेंद्रकृष्ण कापसे 
रविवार, 15 एप्रिल 2018

एक हात नसलेल्या आजींना रेशनिंग कार्ड काढता आले नव्हते त्यांना आता घर पोच रेशनिंग कार्ड मिळणार आहे.

वारजे माळवाडी (पुणे) - आजारपणामुळे चालता येत नाही. त्यामुळे त्यांना केंद्रावर जाऊन आधारकार्ड आता पर्यंत काढता आले नव्हते. परंतु शासन आपल्या दारी हा कार्यक्रमात त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढले. तर एक हात नसलेल्या आजींना रेशनिंग कार्ड काढता आले नव्हते त्यांना आता घर पोच रेशनिंग कार्ड मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे शासन आपल्या दारी नाही तर घरात जाऊन मदत करते असा अनुभव वारजे माळवाडी परिसरात अनुभवास मिळाला. 

वारजे माळवाडी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नगरसेविका सायली वांजळे हिने आयोजित केला होता. रमेश तुकाराम बासूडकर (वय 64, रा. अमृतवेल सोसायटी, वारजे) यांच्या घरी शासन पोचले आणि त्यांचे आधार कार्ड काढले. आमचे वडील रमेश बासूडकर हे 1996 पासून आजारी आहेत. त्यांना जास्त चालता येत नाही. पूर्वी आधार केंद्रापर्यंत जात येत नसल्याने आधार कार्ड काढता आले नव्हते. एकदा आधार केंद्रावर नेले. त्यावेळी त्यांच्या हाताचे ठसे येत नसल्याने त्यांना परत घेऊन जा असे सांगितले. ही वागणूक वेगळी मिळाली. तरी आम्ही जिद्द सोडली नाही. असे त्यांचा मुलगा ऋषिकेश बासूडकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

आम्ही मग जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून घरी आधार कार्ड काढण्याची विनंती केली होती. सुरवातीला उत्तर काही मिळाले नाही. त्याचा पाठपुरावा केला. तर आम्ही तुमच्याकडे येऊ एवढेच उत्तर मिळाली. कधी कोणत्यावेळी याची माहिती स्पष्ट दिली नाही. अखेर नगरसेविका सायली वांजळे यांनी हा कार्यक्रम घेतला. त्यावेळी माझ्या आई उर्मिला बासूडकर रमेश बासूडकर यांना चालत येत नाही. ही वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी संबधित अधिकाऱ्याला सांगितले. त्यांनी होकार दिल्यानंतर आधारचे सर्व मशीन त्यांच्या घरात पोचली. त्यांच्या हाताचे ठसे घेतले त्यांची आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण झाली. असे ऋषिकेश बासूडकर यांनी सांगितले. 

तीन दिवसांच्या कार्यक्रमात आणखी अनुभव असा आला की, एक हात नसलेल्या मावशी आल्या. त्या त्यांच्या आईकडे रहात होत्या. त्यांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची आहे त्या आईकडे राहतात त्यांनी माझाकडे कागदपत्रे घेऊन आल्या होत्या आणि रेशनकार्ड काढून द्याना ताई, मला अशी विनंती केली, त्यांच्याशी बोलताना असे लक्षत आले की, त्या दोघींना रेशनकार्ड वरील अन्नधान्याची फार गरज आहे त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. त्या दोघीच रहात होत्या. ती मावशी वर घर अवलंबून होते. परिस्थिती बेताची असल्याने अधिकऱ्यांनी या महिलेच्या रेशन कार्ड संबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या.

माझे वडील स्वर्गीय आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न मी माझ्या वडिलांच्या प्रमाणे कार्य करण्याचा किंवा सदैव जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करत राहते आणि नेहमीच करत राहणार आहे. एकूणच शासन आपल्यादारी हा माझा उपक्रम पार पडला. पुढच्या वेळी आणखी चांगला कसा होईल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. कार्यक्रमास सहकार्य केलेल्या सर्व अधिकारी वर्गाचे कार्यकर्त्यांचे व नागरिकांचे सहकार्य मिळाले असे सायली वांजळे यांनी सांगितले. या उपक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी ज्योती कदम यामच्या हस्ते झाले. यावेळी, हर्षदा वांजळे, नगरसेवक सचिन दोडके, दिपाली धुमाळ, लक्ष्मी दुधाने, सचिन बराटे, विकास दांगट युवराज वांजळे उपस्थित होते. 

दिव्यांग मतदार नोंदणी वर्ष
सरकारी योजना लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी फक्त शासन अथवा लोकप्रतिनिधी या एकट्याला शक्य नाही. हे दोघे एकत्र येऊन शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून अधिक लाभार्थी पर्यंत पोचणे शक्य होईल. यंदा निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार नोंदणी वर्ष जाहीर केले आहे. त्यानुसार, दिव्यांग मतदार नोंदणी देखील आम्ही शासन आपल्या दारी मधून करणार आहे.
- प्रशांत पिसाळ, तहसीलदार हवेली पुणे

शासन आपल्या दारी कार्यक्रमात या कामांसाठी आलेल्या अर्जाची संख्या 
आधार कार्ड - 350
रेशनिंग कार्ड - 75
रहिवाशी दाखले - 187
उत्पन्न दाखले - 589
ज्येष्ठ नागरिक दाखला - 40 
रेशनिंग कार्ड नाव कमी जास्त करणे - 157

Web Title: The government is taken the Aadhaar card in the house to house