सरकारच्या दोन चुकीच्या निर्णयाने आर्थिक मंदी वाढली : भालचंद्र मुणगेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

'भारताचा आर्थिक विकास दर गेल्या काही महिन्यांपासून कमी होत आहे. मोदी सरकारच्या दोन चुकीच्या निर्णयाने सध्या आर्थिक मंदी वाढली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन निर्णयाचा फटका आज अर्थव्यवस्थेला बसला आहे, अशी प्रतिक्रिया भारत सरकारच्या नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

पुणे : ''भारताचा आर्थिक विकास दर गेल्या काही महिन्यांपासून कमी होत आहे. मोदी सरकारच्या दोन चुकीच्या निर्णयाने सध्या आर्थिक मंदी वाढली आहे. नोटाबंदी, जीएसटी या दोन निर्णयाचा फटका आज अर्थव्यवस्थेला बसला आहे, अशी प्रतिक्रिया भारत सरकारच्या नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

''अनके शोरूम बंद झाले, ऑटोमोबाईल कंपनी बंद झाले. त्यामुळे जवळपास साडे तीन लाख लोकांचा रोजगार गेला. मात्र, भाजप सरकार सध्याची ही परिस्थिती मान्य करायला तयार नाही. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. 

दरम्यान पत्रकार परिषदेत लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या पोस्टरवर हर्षवर्धन पाटील फोटो दिसत होता. दरम्यान चुक लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government two Wrong decision affected countries economy said Bhalchandra Mungekar