सरकारचे शेतमालाविषयी धोरण चुकीचे - खासदार शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

पिंपरी - ‘‘सरकारचे आयात-निर्यात धोरण चुकीचे असल्याने शेतमालाचे भाव गडगडले आहेत,’’ असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला.

भाजपची दोनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक चिंचवड येथे झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने नागरिकांना दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करून देण्यासाठी सर्व विरोधकांनी चिंचवड स्टेशन येथे बुधवारपासून ‘आठवण आंदोलन’ सुरू केले आहे. या आंदोलनाला बुधवारी रात्री शेट्टी यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘भारत सरकारने पाकिस्तानमधून कांदा व तूर आयात केली आहे. यामुळे येथील शेतमालाचे भाव पडले आहेत. शेतकरी तूर घेऊन बाजारात विक्रीसाठी गेला, तर सरकार तूर विकत घ्यायला तयार नाही. यामुळे पदरचे पैसे घालून ती तूर शेतकऱ्याला पुन्हा घरी घेऊन जावी लागत आहे. हीच बाब कांद्याच्या बाबतीतही आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

आंदोलनकर्त्यांना ते म्हणाले, ‘‘तुम्ही जरी आता शहरात राहत असला तरी तुम्ही शेतकऱ्यांची मुले आहात. शेतकऱ्यांच्या वेदना तुम्हाला ठाऊक असल्याने तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहात. मी व माझा पक्ष तुमच्या बाजूने आहे. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.’’

Web Title: The government's farming policy is wrong