सरकारच्या चुकीला माफी नाही - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

हडपसर - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षभर काय ते करावे, त्यानंतर चुन चुनके, तर चुकीला माफी नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हडपसर ग्रामस्थ सत्कार समितीच्या वतीने मुंडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, पगडी देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने महागाई केली, असे सांगत जनतेची दिशाभूल करून भाजप सरकार सत्तेवर आले; मात्र त्यांनी ५० रुपये पेट्रोल ८० वर गेले आणि ४०० चा गॅस ८०० रुपयांचा केला. यातून कोणी महागाई केली ते स्पष्ट होत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत खासदार, आमदार आणि नगरसेवक निवडून आले. मात्र लाट कधी कायम राहिली नाही, हा देशाचा इतिहास अाहे.’ 

राज्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री पुण्याचे आहेत. मात्र पुण्याचा विकास कुठे गेला, अशा शब्दांत मुंडे यांनी गिरीश बापट, दिलीप कांबळे, प्रकाश जावडेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

या वेळी माजी आमदार जगनाथ शेवाळे, कैलास कोद्रे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पक्ष निरीक्षक ॲड. जयदेव गायकवाड, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, नीलेश मगर, नगरसेवक योगेश ससाणे, रत्नप्रभा जगताप, हेमलता मगर, नंदा लोणकर, वासंती काकडे, विजय मोरे, फारूक इनामदार, राहुल शेवाळे, आबा कापरे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The government's wrongdoing is not forgiveness