esakal | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर

sakal_logo
By
अनिल सावळे, सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गुरुवारी (ता. १६) पुणे जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले. राजभवन येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पोलिस उपायुक्त मितेश घट्टे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : शोभेची दारू बनविणाऱ्या कंपनीला आग; एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू

राज्यपाल कोश्यारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोथरूड पौड रस्त्यावरील वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेतील कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १७) सकाळी कोथरूड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी सहा वाजता सायकल रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरवात करतील.

भांडारकर इन्स्टिट्यूट येथे सकाळी १०.४५ वाजता आयोजित कार्यक्रमात कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना योध्दांना सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता सेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल ट्रस्ट आयुर्वेदिक रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करतील. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता ते लोणावळ्याकडे प्रयाण करतील.

loading image
go to top