कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

कार्यक्रमाविषयी...
हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक सर्वांसाठी विनामूल्य असून कार्यक्रम वेळेत सुरू होईल. शाळांनी आगाऊ नावनोंदणीसाठी ९८५००४७९३३, ९३७३०३५३६९ 
या क्रमांकांवर संपर्क करावा.

पुणे - तब्बल एका दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण दिसणार आहे. येत्या २६ डिसेंबरला दक्षिण भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. सूर्यग्रहण पाहण्याचे महत्त्व, त्यामागील विज्ञान व ग्रहणासंबंधीच्या अनेक रंजक गोष्टी समजून घेण्यासाठी येत्या रविवार (ता. १०) पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात सकाळी ८.३० ते ११ पर्यंत व्याख्यानाचे आयोजन कुतूहल-संडे सायन्स स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रसिद्ध खगोल अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या सोबतच इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक विद्यार्थ्यांना भारताच्या चंद्र व सूर्य अभ्यास मोहिमा व त्यातील संधी याविषयी मार्गदर्शन करतील. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रदीप लोखंडे उपस्थितांशी संवाद साधतील. या वेळी संडे सायन्स स्कूलच्या वतीने देशव्यापी ‘सूर्यग्रहण जनजागरण अभियानाचे’ अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक सुयश डाके व दिनेश निःसंग यांनी दिली. सूर्यग्रहण पाहण्यासाठीचे खास सौर चष्मे या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graceful solar eclipse