महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे कमी केला जाणार नाही : मुख्यमंत्री

महेंद्र बडडे
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे : महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे कमी केला जाणार नाही; याबाबत लवकरच आदेश काढू असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना सोमवारी दिले. 
 

पुणे : महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे कमी केला जाणार नाही; याबाबत लवकरच आदेश काढू असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना सोमवारी दिले. 

पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची पुणे मनपा कामगार युनियन, पीएमसी एम्प्लॉईज युनियन, अधिकारी अभियंता संघ, डॉक्‍टर असोसिएशन या संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन "ग्रेड पे'च्या संदर्भातील प्रश्‍नाविषयी चर्चा केली. यावेळी आमदार जगदीश मुळीक, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उल्हास भट, बापू पवार, सुनिल कदम, आशिष चव्हाण, माधव जगताप आदी यावेळी उपस्थित होते. पाचवा वेतन आयोग लागू केल्याने पुणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा "ग्रेड पे' हा राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक होता.

राज्य सरकारने महापालिकेचा आकृतीबंधाला मंजूरी देताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक होणार नाही, अशी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी करीत महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा "ग्रेड पे' कमी केला. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कमी झाल्याने सर्व कामगार संघटनांनी या प्रश्‍नावर आंदोलने केली. 

राज्य सरकारने केलेली सुचना आणि महापालिका प्रशासनाने घेतलेल्या भुमिकेचा फटका 18 हजार कर्मचाऱ्यांना बसत आहे. याप्रश्‍नावर गेल्या दोन महिन्यापासून कर्मचारी संघटना आक्रमकपणे बाजू मांडत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद पडले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या सर्व साधारण सभेत महापौरांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करू, "ग्रेड पे' कमी केला जाणार नाही असे आश्‍वासन दिले होते. लोहगाव विमानतळ येथे महापालिकेतील पदाधिकारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदर आश्‍वासन दिले. 
 

Web Title: The grade of mnc officer and employees will not be reduced said Chief Minister