आगामी काळ हा ऑप्टिकल फायबरचा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मार्च 2019

पुणे - देशात ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान येणे शक्‍य आहे का? असा प्रश्‍न काही वर्षांपूर्वी विचारला जात असे. मात्र, ते साध्य करण्यात आता यश मिळाले आहे, असे मत ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या ऑप्टिकल फायबर विभागाचे अध्यक्ष सुनील उपमन्यू यांनी व्यक्त केले. आगामी काळ हा ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा असेल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या स्वायत्त अभ्यासक्रमाचा चौथा पदवी प्रदान समारंभ शनिवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. संपर्कयंत्रणा अद्ययावत करण्यासाठी नौदलाने ‘फिनोलेक्‍स’कडे मदत मागितली होती. त्या वेळी आम्ही त्यांना देसाई महाविद्यालयात चालविल्या जाणाऱ्या ‘ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन’ या अभ्यासक्रमाची पुस्तके दिले, असेही उपमन्यू यांनी सांगितले. 

‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, उपमन्यू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव हेमंत मणियार, विनोद देडिया, प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, प्रशासकीय अधिकारी अभिजित पवार आदी उपस्थित होते.

विविध विषयांत प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी  
विषय : विद्यार्थ्यांची नावे (प्रथम ते तृतीय क्रमांक अनुक्रमे)
ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन - प्रतीक्षा झांबरे आणि सिद्धी तळेकर, धनश्री निम्हण, कावेरी हिल्ली
मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट - रणजित एकापल्ल्या, ऋषीकेश जोशी, अस्मिता गोऱ्हे
कॉम्प्युटर नेटवर्किंग इसेंशिअलस्‌ - प्रदीप वाघेला, केतनकुमार परमार आणि मोहिनी मुंडे, प्रियांका ओझा आणि प्रज्ञा राऊत, पुनीत शहा, वृषभ ढिंगे, प्रणीता साखरे, मानसी पांचोली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduation ceremony Optical Fiber