रांजणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व.. जावा-जावा आमने सामने...

रांजणी ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या एकूण बारा जागा पैकी 10 जागा बिनविरोध
Gram panchayat election result ambegaon ranjani gram panchayat chaya wagh win ncp politi
Gram panchayat election result ambegaon ranjani gram panchayat chaya wagh win ncp politi

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत वाघ कुटुंबातील जावा- जावा आमने -सामने लढल्या परंतु मोठी जाव छाया बंडेश वाघ यांनी छोटी जाव मंगल निलेश वाघ यांच्यावर मात करत सरपंचपदाची खुर्ची पटकावली. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल ने बाजी मारली. रांजणी ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतीच्या एकूण बारा जागा पैकी 10 जागा बिनविरोध झाल्या दोन जागा मध्ये एक सरपंचपद व एक सदस्य पदासाठी निवडणूक झाली, निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्रीलक्ष्मी नरसिंह भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व बाळासाहेबांची शिवसेना- शिंदे गट पुरस्कृत नरसिंह भैरवनाथ विकास पॅनेल यांच्यात सरपंचपद व एक सदस्य पदासाठी निवडणूक झाली सरपंचपदी राष्ट्रवादीच्या छाया बंडेश वाघ यांनी आपली चुलत जाव मंगल निलेश वाघ यांचा 339 मतांनी पराभव केला.

तर सदस्यपदाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्रीलक्ष्मी नरसिंह भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार संतोष दशरथ भोर यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे: विजय सुरेश वाघ,मधुसूदन मुरलीधर भोर,रमेश सरदार भोर, मनीषा रमेश भोर,माधवी सुनील सोनवणे,संगीता दिलीप उबाळे,संगीता अभिजित भोर बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत महेश गुलाब भोर,हिराबाई विठ्ठल भोर,प्रतिभा गुलाब वाघ. चौकट...रांजणी गावात आल्यानंतर सरपंच छाया वाघ निवडून आलेले संतोष भोर यांच्यासह बिनविरोध सदस्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला,यावेळी केतन वाघ,जयसिंग थोरात,भगवान वाघ महादेव भोर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com