ग्रामपंचायतीत बेकायदा नोकर भरती

ज्ञानेश सावंत
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये बेकायदा नोकर भरती असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेत आल्यानंतर काही दिवसांत या गावांतील लोकप्रतिनिधींनी १३४ जणांना नेमल्‍याचे पाहणीत दिसून आले आहे.  तेव्‍हा संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्याचा तोंडदेखलेपणा महापालिकेने केला आहे.

विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींचे दप्तर महापालिकेच्या ताब्यात देण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या नोंदवहीत फेरफार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाईची भूमिका महापालिकेने घेतली आहे; पण लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्याचा उद्योगही प्रशासन करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हद्दीलगतच्या अकरा गावांचा गेल्या ऑक्‍टोबरमध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यानंतर लगेचच महापालिकेने संबंधित क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या  गावांमध्ये कामकाजही सुरू केले तेव्‍हा या गावांमधील कर्मचारी महापालिकेच्‍या सेवेत घेण्यात आले.

त्याकरिता, त्यांच्याकडील दप्तर ताब्यात घेण्यात आले. मात्र नोंदवह्या महापालिकेकडे देण्यास काही ग्रामपंचायतींनी वेळ लावला होता. त्या वेळी विशेषत: बांधकामे आणि ग्रामपंचायतींकडील कर्मचाऱ्यांच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याची शक्‍यता होती. त्यामुळे नोंदीची तपासणी प्रशासनाने केली. त्यात, काही कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबत प्रश्‍न निर्माण झाल्याने तपशील मागविण्यात आला. त्यात काही त्रुटी असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे नव्या ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या सर्व नोंदी तपासण्यात येत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची गेल्या दहा महिन्यांत नेमणूक झाली, त्याचा नेमका आधार, या भरतीची प्रक्रिया आणि त्यांचे वेतन या बाबी संशयास्पद असल्याचे आढळून आले आहे.   

महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या गावांच्या ग्रामपंचायतींनी सादर केलेली माहिती तपासण्यात येत आहे. त्यातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल. जुन्या-नव्या कर्मचाऱ्यांच्‍या भरतीची प्रक्रिया तपासली जाईल. बेकायदा कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेची चौकशी करू. 
- राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Gram Panchayat illegal recruitment