pune.jpg
pune.jpg

जुन्नर मधील ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबलने जोडल्या जाणार

जुन्नर : महानेट प्रकल्पांतर्गत जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हायस्पीड इंटरनेट साठी ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार असून आज सोमवार ता.२५ रोजी या कामाचा शुभारंभ आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. महानेट प्रकल्पांतर्गत तालुक्यातील १४२ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत. यासाठी तालुक्यात सुमारे ६०८ किलोमीटर लांबीची ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यात येणार आहे.

राज्यातील तेरा हजार ग्रामपंचायतींचा लेखाजोखा संबंधीत तहसील कार्यालयाशी जोडण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाकांक्षी प्रकल्प २०१८ मध्ये सुरु केला आहे.यामुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवणे सोयीचे जाणार आहे. पंचायतीच्या निधींच्या खर्चावर देखरेख ठेवता येणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी यावेळी सांगितले. 

पाडळीचे सरपंच संतोष केदारी, अमरापुरचे सरपंच संजय गाडेकर, उपसरपंच अरुण पापडे, मनीषा लोखंडे, निलेश चव्हाण, सिद्धेश ढोले, गणपत कासार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. एप्रिल अखेर सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबलने जोडल्या जाणार आहेत. हे काम करत असताना रस्ते व इतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता ठेकेदारांने घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com