बाबुर्डीच्या ग्रामसेवकास लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

रामती - नवीन घराची नोंद व्यवस्थित लावून आठ अ उताऱ्यावर योग्य त्या नोंदी घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना विठ्ठल वामनराव घाडगे या तालुक्‍यातील बाबुर्डी येथील ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

बाबुर्डी येथील एका शेतकऱ्याच्या घराची नोंद घेणे, आठ अ उताऱ्यावर बॅंकेचा बोजा चढवून नवीन उतारा देणे, गटविकास अधिकाऱ्यांकडे सकारात्मक शिफारस करण्याच्या कामासाठी विठ्ठल घाडगे यांनी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. लाच घेण्यासाठी घाडगे याने तक्रारदाराला कसब्यातील दूध संघाच्या पेट्रोल पंपावर बोलावले होते. तेथेच त्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल घाडगे याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Gramsevak arrested in taking bribe