सांगवी स्मशानभुमी नुतणीकर एक वर्षाच्या कामाला दोन वर्ष

रमेश मोरे
गुरुवार, 24 मे 2018

जुनी सांगवी येथील मुक्तिधाम स्मशानभुमी नुतनिकरणाचे काम गेली दोनवर्षापासुन सुरू आहे. कासव गतीने सुरू असलेले काम एक वर्षाच्या कालावधीत पुर्ण करणे अपेक्षित होते. महापालिकेकडील संपादीत जागा व शिल्लक जागेवर काही जागामालकांनी मालकी हक्काचा दावा केला होता. जागेचा मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात या कामाची सुरूवात करण्यात झाली. एका वर्षाच्या मुदतीचा कालावधी असलेले काम गेली दोन वर्षापासुन सुरू आहे.

सांगवी : जुनी सांगवी येथील मुक्तिधाम स्मशानभुमी नुतनिकरणाचे काम गेली दोनवर्षापासुन सुरू आहे. कासव गतीने सुरू असलेले काम एक वर्षाच्या कालावधीत पुर्ण करणे अपेक्षित होते. महापालिकेकडील संपादीत जागा व शिल्लक जागेवर काही जागामालकांनी मालकी हक्काचा दावा केला होता. जागेचा मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात या कामाची सुरूवात करण्यात झाली. एका वर्षाच्या मुदतीचा कालावधी असलेले काम गेली दोन वर्षापासुन सुरू आहे.

यात मुख्य दाहिनीचे शेड काढुन त्याजागी आरसीसी बांधकाम, निवारा शेड, नदीपात्रावरील पायऱ्यांचे काम पुर्ण झाले आहे. रस्ता व उर्वरीत बैठक व्यवस्था निवारा शेडचे काम शिल्लक आहे. या स्मशानभुमीचा निवडणुक काळात राजकीय मुद्दा बनल्याने मोठा गाजावाजा झाला होता. विद्यमान सत्ताधारी मंडळी व माजी सदस्यांमधे आरोप प्रत्यारोपाचे राजकारणही झाले होते. सद्यस्थितीत मुख्य दाहिनी बांधकाम, घाट परिसराच्या पायऱ्यांचे सुशोभिकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निवारा शेड आदी कामे पुर्ण झाली आहेत. बांधकामासमोरील जागेत निवारा बैठक व्यवस्था, थेट रस्ता, कमानीचे काम शिल्लक आहे. याबाबत स्थापत्य विभाग, नगरचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी माजी स्थायी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या सोबत कामाची पाहणी करून शिल्लक कामाबाबत चर्चा केली. चर्चेतुन काम मार्गी लागेल अशी भावना पालिका अधिकाऱ्यांकडुन व्यक्त करण्यात आली. यावेळी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुबे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, नगरविकास उपअभियंता सुनिल शिंदे, शिरिष पोरेडी, प्रभाग स्थापत्य अभियंता आदी उपस्थित होते. 
"विद्यमान सत्ताधाऱयांच्या नाकर्तेपणामुळे स्मशानभुमीचे काम गेली वर्षभरापासुन रखडलेले आहे. केवळ त्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी माझ्यावर आरोप केले गेले." प्रशांत शितोळे शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस 

"येथील त्रुटींची पुर्तता करून चर्चेतुन शिल्लक राहिलेले काम सुरू करण्यात येईल." संतोष घुबे कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग
 

Web Title: graveyard work delay from two years