#Full2Smart पारवडीत 'फुल टु स्मार्ट' स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद

संतोष आटोळे 
शनिवार, 30 जून 2018

शिर्सुफळ (पुणे) : अभ्यास ही शालेय जीवनाची एक बाजू. त्या जोडीला अवांतर ज्ञान मिळाले तर बौद्धिक विकासाला ते पूरक ठरेल. यासाठी सकाळ माध्यम समुहाच्या ‘फुल टु स्मार्ट’ स्पर्धेच्या माध्यमातुन शालेय जीवनात कोणत्याही प्रश्‍नाला थेट भिडून त्याची उकल करण्याची वृत्ती मुलांच्या अंगी बाणविली जाईल. अणि मुलांच्या ज्ञानात भर पडेल अशा विश्वास कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सखाराम गावडे यांनी व्यक्त केला.  

सकाळ तर्फे आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी फुल टु स्मार्ट या स्पर्धेमध्ये पारवडी (ता.बारामती) येथील कै जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सकाळच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या शालेय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी करण्यात आलेल्या प्रवेशिका वाटपाचा कार्यक्रमही विद्यालयाच्या वतीने आगळावेगळ्या रितीने साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळ व फुल टु स्मार्ट स्पर्धेचा लोगोची प्रतिकृती रेखाटण्यात आली.

यावेळी बोलताना सखाराम गावडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले तसेच वर्तमानपत्र वाचनाने आपणास वाचनाची गोडी निर्माण होते, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास व देश विदेशामधील चालू घडामोडी आपणास समजतात असे प्रतिपादन केले.तत्पूर्वी विद्यार्थी व शिक्षकांना या स्पर्धेबाबतची माहिती सकाळचे वितरण विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक मनोज काकडे यांनी दिली. तर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेसाठी विद्यालयातील शिक्षक सोमनाथ गौडगाय, दत्तात्रय फडतरे, दिपक नलावडे, नितिन खोमणे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी घेतला.

दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगीताताई गावडे, पारवडी गावचे सरपंच जिजाबा गावडे, माजी पंचायत समिती सदस्य तानाजी गावडे, उपसरपंच अनिल आटोळे व ग्रामस्थांनी सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले.

Web Title: great response to sakal full to smart competition in parwadi