कॉंग्रेस नेतृत्वहीन झाल्याने नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता - राधाकृष्ण विखे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Vikhe Patil

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व राहिलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार हे अस्वस्थ आहेत.

कॉंग्रेस नेतृत्वहीन झाल्याने नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता - राधाकृष्ण विखे पाटील

पुणे - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व राहिलेले नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार हे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच कॉंग्रेसचे दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करू लागले आहेत, असा दावा पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता.२) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. कॉंग्रेसमधील अस्वस्थ अनेक नेते हे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. भाजपत येणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांचे स्वागत केले जाईल, असेही विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभासाठी विखे पाटील शुक्रवारी पुणे शहरात आले होते. या भूमिपूजन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष हा जगात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला राष्ट्रीय पक्ष आहे. यामुळे भाजप हा जगातील सर्वात मोठा असलेला एकमेव पक्ष आहे. याउलट कॉंग्रेस पक्षाला आता राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व उरलेले नाही. त्यामुळे हा पक्ष दिवसेंदिवस कमकुवत बनत चालला आहे. यातून कॉंग्रेसचे दिग्गज नेते अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थतेतून ते कॉंग्रेसच्या बाहेर पडून दुसरा राजकीय पर्याय शोधू लागले आहेत.’’

Web Title: Great Restlessness Among Leaders As Congress Is Leaderless Radhakrishna Vikhe Patil Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..