पुण्यात शनिवारपासून ग्रीन होम एक्‍स्पो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पुणे - शहरातील धावपळीच्या आणि ताणतणावयुक्त जीवनशैलीपासून मुक्तता मिळवून निसर्गरम्य आणि शांत वातावरणात रममाण होण्यासाठी आपले स्वतःचे एक फार्म हाउस कम सेकंड होम असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने  २३ व २४ जूनदरम्यान ग्रीन होम एक्‍स्पो- सीझन १८चे आयोजन करण्यात आले आहे. 
दरम्यान, एक्‍स्पोकरिता शेवटचे काही स्टॉल शिल्लक असून, लवकरात लवकर संपर्क करणाऱ्यांस प्राधान्य देण्यात येणार आहे. 

स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे होणाऱ्या ग्रीन होम एक्‍स्पोमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली अनेक पर्याय, तर या क्षेत्रातील उद्योगांना अनेक ग्राहक हमखास उपलब्ध होणार आहेत. एक्‍स्पोमध्ये बंगलो प्लॉट्‌स, अकृषक (एनए) प्लॉट्‌स, फार्म हाउस प्लॉट्‌स, रेडी फार्म हाउस, वीकेंड होमबाबत माहिती घेण्याची संधी ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार आहे. 

याशिवाय मालमत्ता विकू इच्छिणाऱ्या संस्थांनाही एकाच वेळी हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पाचण्याची संधी यातून मिळणार आहे.

एक्‍स्पोची वैशिष्ट्ये...
 भरपूर जागा, आकर्षक रचना 
 योग्य ग्राहक, गुंतवणुकीचा 
पुरेपूर लाभ 
 विविध प्लॉट्‌स विक्रीसाठी सुवर्णसंधी 

...असा असेल एक्‍स्पो 
 स्थळ : गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट 
 कालावधी : २३ व २४ जून  
 स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : 
रूपेश ८८८८५२९५००, 
सुशांत ९८५००८५६५४

Web Title: green home expo