पुणे हवा बदलतीये...!

योगिराज प्रभुणे
बुधवार, 28 मार्च 2018

हवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे... 
‘छान हवा’ ही पुण्याची ओळख 
आता पुसली जात आहे...!

हवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे... 
‘छान हवा’ ही पुण्याची ओळख 
आता पुसली जात आहे...!

उन्हाळा, पावसाळ्यात का होते प्रदूषण कमी?
 उन्हाळ्यात जमिनीलगतची हवा तापल्याने हलकी होऊन आकाशात जाते आणि आकाशातील थंड असलेली जड हवा जमिनीलगत येते. उन्हाळ्यात हवेचे अभिसरण झाल्याने प्रदूषण कमी होते.
 जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. पावसाच्या पडणाऱ्या पाण्यात प्रदूषके विरघळतात. हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी होते.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या विश्‍लेषणाचे निष्कर्ष  
 मार्च ते मे व जून ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये प्रदूषणाची पातळी कमी 
 सप्टेंबरनंतर हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढते 

का वाढते प्रदूषणाची पातळी?
सप्टेंबर- ऑक्‍टोबरनंतर थंडी वाढते, 
त्यामुळे हवेचे अभिसरण कमी होते. 
हवामान कोरडे असल्याने 
हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढते.

क्रमशः 

Web Title: GreenPune pune pollution sakal environment