जुनी सांगवी परिसरात बाबासाहेबांना अभिवादन

रमेश मोरे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवी व परिसरात विविध सामाजिक संस्था, संघटना व समाज बांधवांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जुनी सांगवी येथील राहुल तरूण मंडळाच्या वतीने पुर्वसंध्येला कॅंडलमार्च काढुन अभिवादन करण्यात आले. सामुहिक वंदना करण्यात आली. 

राहुल तरूण मंडळाचे पंकज कांबळे दत्तोबा कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र लांडगे, तुषार कदम, स्वप्निल चाबुकस्वार, सागर भोसले, अजिंक्य कांबळे, फुलनबाई केदारी, अर्चना डोळस, भिमा भंडारी, यांनी परिश्रम घेतले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रं.२८ पिंपळे सौदागर आरोग्य कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

यावेळी आरोग्य सहाय्यक  दिपक माकर, कर्मचारी सिद्धार्थ सातपुते, शिवाजी माने, संतोष कांबळे, रामा मंजाळ व आदी कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: greetings to dabasaheb in old Sangvi area