किराणासाठी ‘स्वाइप’ दुप्पट

सलील उरुणकर @salilurunkar 
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नोटाबंदी निर्णयानंतर महिनाभरातील परिणाम; पुणेकरांकडून ‘डिजिटल पेमेंट’चा स्वीकार

पुणे - चलनबदलाच्या निर्णयानंतर पुणेकरांचे किराणा दुकानांमध्ये ‘कार्ड पेमेंट’ करण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. तसेच, शहरातील ‘एटीएम’ केंद्रांमधून ८ नोव्हेंबरपूर्वी काढण्यात येणाऱ्या रकमेच्या तुलनेत सध्या फक्त २५ टक्के रक्कम काढली जात असली, तरी ती अधिकाधिक लोकांना मिळत आहे. म्हणजे कमी रकमेचे अधिक व्यवहार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी झाला. त्यापूर्वी व निर्णय झाल्यानंतरच्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीतील पुणेकरांच्या आर्थिक व्यवहारांचे बदलते ट्रेंड्‌स टिपले जात आहेत. या ‘ट्रेंड’मधले एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे टीव्हीसारख्या उपकरणांची मोठ्या रकमेची खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय बहुतांश पुणेकरांनी घेतला आहे. चलनबदलाच्या निर्णयानंतर ऑनलाइन शॉपिंगमध्ये झालेला हा बदल लक्षणीय आहे. लग्नाची खरेदी देखील कार्ड पेमेंटद्वारे करण्यात येत आहे. 

किराणा मालाच्या खरेदीसाठी पूर्वी एक लाख नागरिक कार्डचा वापर करीत होते. आता ती संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. कोथरूड, औंध, विमाननगर, कॅंप, डेक्कन, कल्याणीनगर भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
- अमित भोर, ‘वॉलनट’चे स्टार्टअप, संस्थापक

पुण्यातील एटीएमचे व्यवहार - दृष्टिक्षेपात
१)  एटीएममधून काढण्यात येणारी सरासरी रक्कम ८ नोव्हेंबरपूर्वी -
      ४५०० रुपये (प्रति माणशी)
      चलनबदलाच्या निर्णयानंतर : २१०० रुपये
२)    ‘मोबाईल वॉलेट’चा वापर : ५ पटीने वाढला 
३)    चलनबदलापूर्वीच्या तुलनेत ‘एटीएम’मधून पैसे काढण्याच्या एकूण टक्केवारी पैकी फक्त ४५ टक्के व्यवहार (ट्रॅन्झॅक्शन) होत आहेत.

पुणेकरांनी असा केला खर्च 

जादा किमतीच्या वस्तूंची खरेदी टाळण्याकडे कल 
छोट्या रकमेच्या व्यवहारांमध्ये वाढ 
खाण्या-पिण्यावरील कार्डद्वारे खर्च करण्यात १२० टक्‍क्‍यांची वाढ 

Web Title: Grocery for 'swipe' double