जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी पाच सिईओंचा अभ्यासगट

गजेंद्र बडे
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाऱ्या ऑनलाइन जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच सदस्यीय अभ्यासगट बुधवारी (ता.5) स्थापन केला आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाऱ्या ऑनलाइन जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच सदस्यीय अभ्यासगट बुधवारी (ता.5) स्थापन केला आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे हे या अभ्यासगटाचे सदस्य-सचिव असणार आहेत. अन्य तीन सदस्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे राहुल कर्डिले, नंदुरबारचे विनय गौडा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप
राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण 17 फेब्रुवारी 2017 पासून अमलात आणले आहे. या धोरणात्मक निर्णयास अनुसरून सरकारने अनेकदा शुद्धीपत्रके आणि अध्यादेश प्रसिद्ध केलेले आहेत. याशिवाय 24 एप्रिल 2017 ला शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत काही त्रुटी शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेचा अभ्यास करून, त्यात सुधारणा करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या धोरणांचा अभ्यास करून सरकारला बदल्यांबाबत शिफारशी सुचविण्यासाठी हा अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.

फुल विक्रेत्याच्या खात्यात जमा झाले 30 कोटी रुपये; अन्...

या अभ्यासगटाने येत्या 10 फेब्रुवारीला प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि बदल्यांसंदर्भात येणारे अनुभव यांचा तौलनिक अभ्यास करावा आणि येत्या 11 फेब्रुवारीला सरकारला अहवाल सादर करण्याचा आदेश या अभ्यासगटाला देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: group of five CEOs for teacher transfers In ZP