झोपडपट्टी पुनर्वसनासाठी "टीडीआर' वाढविणार 

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी "टीडीआर' वाढविणार 

पुणे - ""ठप्प झालेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला चालना देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने नवीन उपाययोजना सुचविली असून, टीडीआरचे गुणोत्तर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे,'' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली. 

शहराच्या मध्यवस्तीत आयोजित केलेल्या पदयात्रा आणि कोपरा सभेच्या निमित्ताने ते बोलत होते. बापट म्हणाले, ""कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील गुंता वाढविल्यामुळे ही योजना फसली. त्यांच्या कालावधीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा नुसता गवगवा झाला. एसआरए 

योजनेतील अनेक गैरप्रकार उघडकीस आले. कोट्यवधी चौरस फुटांच्या टीडीआरचा गैरवापर झाला. अयोग्यपणे टीडीआर दिला गेला; पण गरिबांना सदनिका मिळाल्याच नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली. शहरातील चाळीस टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांना हक्काची घरे देण्यासाठी भाजपने पुण्यातील सर्व झोपडपट्ट्यांची पाहणी केली असून, त्यांना जागेवरच हक्काची घरे बांधून देण्यासाठी सर्वंकष योजना तयार केली आहे.'' 

शासकीय जागांवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजना सुरू आहेत. पण कामे ठप्प झाली आहेत. बांधकामे अर्धवट आणि प्रलंबित आहेत. ती 

सर्व प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी नियमावलीत बदल करण्यात येणार आहे. शहराचे वेगवेगळे झोन विचारात घेऊन ए बी सी डी झोननुसार टीडीआरचे  गुणोत्तर वाढविण्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांनी अभ्यास केला असून, टीडीआर वाढविण्याचा पक्षाचा विचार आहे. या धोरणानुसार येत्या पाच वर्षांत पुणे शहरात 
आम्ही पन्नास हजार घरे बांधणार आहोत. 

झोपडपट्टीतील गुंडगिरी आणि दादागिरी निपटून काढण्यासाठी राज्य शासनाच्या गृह खात्याशी विस्ताराने चर्चा झाली आहे. त्यावरील उपाययोजना महापालिकेत सत्ता येताच अमलात आणल्या जातील. वीज आणि पाणी या सुविधा निर्माण करण्यासाठी पायाभूत आराखडा आम्ही तयार करीत आहोत. तसेच झोपडपट्ट्यांमध्ये संगणक साक्षरता आणून तेथील सेवांचे डिजिटलायझेशनही करणार आहोत. झोपडपट्‌ट्‌यांतील महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे जाळे उभारून घरगुती पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमची योजना तयार आहे, असेही बापट यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com