जीएसटी कमी करावा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे - ‘शेतीच्या अवजारांवरील जीएसटी अठरावरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी केल्यास शेतकऱ्यांना मदत होण्याबरोबरच त्यांची विक्रीही वाढेल,’’ असे मत ‘पुणे मशिनरी मर्चंट्‌स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले; तसेच या विक्रेत्यांची मुख्य बाजारपेठ शुक्रवार पेठेत असल्याने या भागात ‘वाय-फाय झोन’ असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘सकाळ’ने या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच आयोजित केली होती. संघटनेचे अध्यक्ष सुरेखा सांडभोर, ज्येष्ठ सल्लागार रामनिवास सोनी, उपाध्यक्ष सूरजितसिंग गुलाटी, सचिव प्रदीप वाव्हळ, सहसचिव सुनील कपाडिया, राजेंद्र बोरसे, नरेश मेघाणी, राहुल क्षीरसागर, एम. टी. पालवे आदी 
या वेळी उपस्थित होते. 

महात्मा फुले मंडईत येणाऱ्या शेतकऱ्यांना जवळ पडावे, यासाठी शुक्रवार पेठेत शेती अवजारांच्या विक्रीची बाजारपेठ तयार झाली. पाणी उपसणारे पंप, जलवाहिन्यांसह इतर यंत्रसामग्रीची विक्री या बाजारात प्रामुख्याने होते. शेतकऱ्यांना शेतीवरील अनुदान मिळण्याची शाश्‍वती नसल्यामुळे हलक्‍या दर्जाचा माल ते वापरतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते, असे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

शेतीच्या अवजारांवरील जीएसटी १८ टक्के असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आणि व्यापारही कमी होतो. त्यामुळे या अवजारांवरील जीएसटी पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी करावा. तसेच शुक्रवार पेठ भाग ‘वाय-फाय झोन’ करावा, असेही या प्रतिनिधींनी सांगितले.

व्यवसाय आणि उलाढाल
 शेती अवजारे विकणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या : पुणे शहर - ६०, जिल्ह्यात - १७०.
 पुण्यातील संपूर्ण व्यवसायाची उलाढाल : ५०० कोटी.
 यंत्रसामग्री, अवजारे ठेवण्यासाठी मध्यवर्ती संकुलाची गरज.

Web Title: GST issue pune machinery merchant association meeting