GST News: जीएसटीच्या बोजाचे विपरित परिणाम, व्यापारी मेटाकुटीला; शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल

जीएसटीच्या कररचेनवरुन पवारांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं.
Sharad pawar
Sharad pawarsakal

बारामती : करांमधून सरकारला उत्पन्न मिळतं ही बाब मान्य आहे. पण हा कर लादताना त्याचं विशिष्ट प्रमाण असावं अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. (GST News adverse effects of GST burden on traders Sharad Pawar attacked Centre)

Sharad pawar
Dengue: 'त्या' रुग्णाचा मृत्यू खरंच मोसंबीच्या ज्यूसमुळं झाला होता? धक्कादायक कारण आलं समोर

बारामती मर्चंटस असोसिएशनच्यावतीनं दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी शरद पवारांच्या मार्गदर्शनपर भाषणाचं आयोजन केलं जातं. या भाषणात व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबत नाराजी व्यक्त केल्याचा धागा पकडून शरद पवारांनी कररचनेबद्दल केंद्रावर हल्लाबोल केला. पवार म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जीएसटी लागू करण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक विरोध दर्शवला होता. मात्र, आज त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. जीएसटीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला दिसतो आहे.

Sharad pawar
'अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'; गोविंद बागेतील पोस्टरची चर्चा

सोन्याच्या खरेदीवर 38 टक्क्यांपर्यंत, वाहन खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे. या माध्यमातून रोजगारनिर्मिती तर होतेच पण त्याच बरोबर अनेक लघुद्योगही चालतात. यामुळं हा कर सर्वांवर परिणाम करणारा ठरतोय. व्यापार वाढवायचा असेल तर राज्य व केंद्राचे धोरण पूरक, प्रोत्साहनपर हवं, अशी अपेक्षाही यावेळी पवारांनी व्यक्त केली.

जीएसटीमुळं भुर्दंड वाढला - वाडीकर

साखर कारखान्यांनी साखरेसोबत इथेनॉल व वीजनिर्मिती सुरु केल्यानं अनेक कारखान्यांनी आता जिल्हा बँकाकडून कर्जे घेणं थांबविलं असून ते स्वयंपूर्ण होत आहेत. ब्राझील व थायलंडमधील संकटाचा भारतीय साखर उद्योगाला चांगला फायदा मिळणार असून त्यामुळं बाजारपेठेतही उर्जितावस्था येईल, असं यावेळी मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्ताविकात म्हटलं. जीएसटीमुळं भुर्दंड वाढला, गुळाची आवक मंदावली. वारंवार कररचनेतील बदलांचा फटका बसत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, पौर्णिमा तावरे, जवाहर वाघोलीकर, अमोल वाडीकर, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, किशोर सराफ, सदाशिव सातव, जय पाटील, नीलेश भिंगे, सचिन सातव, नीलेश निंबळककर, यश संघवी, तेजपाल निंबळककर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com