GST
GST

‘जीएसटी’ चोरीचे रॅकेट

पुणे - दहा बनावट कंपन्या स्थापन करून, त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची केवळ बिले तयार करून, काळा पैसा निर्माण करणाऱ्या एका मुंबईतील व्यापाऱ्याला जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने अटक केली. यामागे ‘रॅकेट’ असून, देशाच्या वेगवेगळ्या भागांत त्यांचे असे ‘उद्योग’ सुरू असावेत, असा पुणे विभागाचा अंदाज आहे. या प्रकरणात ८० कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) चुकविण्यात आल्याचे उघड झाले असून आणखी काही व्यापाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत.  

बनावट कंपन्यांद्वारे मालाचा पुरवठा झाला अन्‌ बिले तयार करून गैरव्यवहार होत असल्याची माहिती जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार गेले काही महिने तपास करून त्यांनी मोडसिंग पद्मसिंग सोढा याला शुक्रवारी रात्री मुंबईतून अटक केली. त्याला १४ दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने शनिवारी दिला. त्याच्याशी संबंधित काहीजणांची नावे अधिकाऱ्यांना समजली असून, त्याच्याबाबत मुंबई-पुण्यात तपास सुरू आहे. जीएसटी कायद्यान्वये पुणे विभागाकडून अटकेची पहिलीच कारवाई झाली आहे.

असा झाला गैरव्यवहार
मुंबईतील सिपी टॅंक भागात स्क्रॅप आणि अलॉय मेटल्सची कंपनी सोढाने स्थापन केली होती. तिच्या माध्यमातून माल आणि त्याची बिले, तयार करून कोट्यवधी रुपये फिरविले जात होते. सुमारे ४१५ कोटी रुपयांची बिले त्याने गेल्या वर्षी एक जुलैपासून तयार केली होती. सुमारे ८० कोटी रुपयांचा जीएसटी त्याने बुडविला. पहिल्या टप्प्यात त्याच्याकडून दोन कोटी १८ लाख रुपयांचा ‘जीएसटी’ वसूल करण्यात आल्याची माहिती जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाच्या उपसंचालक राजलक्ष्मी कदम यांनी दिली.

बनावट बिलांच्या माध्यमातून नेमका कोणाचे पैसे फिरविण्यात आले, त्यात कितीजण सहभागी आहेत, याबाबत सखोल तपास सुरू आहे. या रॅकेटने सुमारे ९०० कोटी रुपयांची बनावट बिले तयार केली आहेत. बॅंकांमध्येही त्याचा वापर झाला असावा, असा संशय आहे. त्यामुळे काही राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांकडेही याबाबत तपास सुरू झाला. यातून मोठा गैरव्यवहार बाहेर पडू शकतो, असाही अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com