#StreetDogs भटकी कुत्री नसबंदीबाबत पालकमंत्र्यांनाही शंका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

कुत्र्यांची वाढणारी संख्या लक्षात घेता शस्त्रक्रिया व नसबंदी योग्य पद्धतीने होत नाही, असे वाटते. ही यंत्रणा आणखी सक्षम करायला हवी. कुत्री पकडण्यासाठी व मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशा गाड्या आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत,'' असेही त्यांनी नमूद केले. 

पुणे : शहरातील भटक्‍या कुत्र्यांवर केल्या जाणाऱ्या नसबंदीच्या शस्त्रक्रियेविषयी नगरसेवकांपाठोपाठ आता पालकमंत्री गिरीश बापट यांनीही शंका व्यक्त केली. ही यंत्रणा योग्य पद्धतीने काम करते की नाही, यावर देखरेख ठेवली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. नायडू रुग्णालयाजवळ महापालिकेच्या आरोग्य विभागाने उभारलेल्या इन्सिनरेटर प्रकल्पाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी खासदार प्रदीप रावत, प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, प्रकल्प अभियंता प्रल्हाद शिंदे आदी उपस्थित होते. भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाल्याच्या प्रश्‍नाकडे बापट यांनी लक्ष वेधले. ""कुत्र्यांची संख्या नेमकी किती?, याचा आकडा कळत नाही. कुत्र्यांची नसबंदी महापालिकेकडून केली जाते.

कुत्र्यांची वाढणारी संख्या लक्षात घेता शस्त्रक्रिया व नसबंदी योग्य पद्धतीने होत नाही, असे वाटते. ही यंत्रणा आणखी सक्षम करायला हवी. कुत्री पकडण्यासाठी व मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशा गाड्या आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत,'' असेही त्यांनी नमूद केले. 
 
Web Title: Guardian minister also doubts about vasectomy