भोर नगरपालिकेतील मक्तेदारी संपवणार : पालकमंत्री बापट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

भोर : राज्य सरकारने दिलेल्या निधीचे राजकारण करणारे कॉंग्रेसचे आमदार थोपटे यांची नगरपालिकेतील मक्तेदारी संपवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. येथील गंगोत्री हॉलमध्ये रविवारी (ता. 10) झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

भोर : राज्य सरकारने दिलेल्या निधीचे राजकारण करणारे कॉंग्रेसचे आमदार थोपटे यांची नगरपालिकेतील मक्तेदारी संपवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. येथील गंगोत्री हॉलमध्ये रविवारी (ता. 10) झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

या वेळी भाजपाचे संघटक मंत्री रवी अनासपुरे, संघटक सचिव सचिन सदावर्ते, तालुकाध्यक्ष गणेश निगडे, शहराध्यक्ष सचिन मांडके, महिलाध्यक्षा शारदा चौबे, शहराध्यक्षा स्वाती गांधी, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य बाळासाहेब गरुड, सागर जोशी, अमर बुदगुडे, राजेंद्र गुरव, माजी नगराध्यक्षा दीपाली शेटे, माजी नगरसेवक सतीश शेटे, राजेंद्र गुरव, राजेंद्र मोरे, विश्‍वास ननावरे, विजयकुमार वाकड़े, सुरेश वाडकर आदी उपस्थित होते.

भोर दौऱ्याच्या सुरवातीस पालकमंत्री बापट यांनी जिल्हा नियोजन मंडळामार्फत 58 लाख रुपये खर्चून वाघजाई मंदीराच्या सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. या वेळी वाघजाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ भेलके-पाटील, सुरेद्र गुजराथी, अप्पा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय राजवाडा चौकातील 13 लाख रुपये खर्चून महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहाचेही भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. बापट यांनी या वेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोचविण्याचे आवाहन केले. तालुकाध्यक्ष गणेश निगडे यांनी भाजपाकडून नगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले. सचिन मांडके यांनी प्रास्ताविक तर विठ्ठल पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

विरोधकांचे पक्षपाती राजकारण : बापट 
भाजपा सरकारकडून पक्षपाती राजकारण न करता भोर नगरपालिकेला निधी दिलेला आहे. विरोधक मात्र पक्षपातीपणा करत आहेत. येथील स्थानिक नेते आम्ही काम केल्याचे दाखवत बोर्डावर नावे लिहितात. त्यांनी कितीही बोर्ड लावले आणि पैशाची मस्ती केली तरीही भोरची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. त्यांची सत्ता असूनही गेल्या 15 वर्षांत त्यांना नगरपालिकेला निधी आणता आला नाही, परंतु आमची सत्ता आल्यावर आम्ही नगरोत्थानमधून भोर नगरपालिकेस 5 कोटी रुपयांचा निधी दिला. तरीही त्यांच्याकडून राजकारण केले जात आहे. मात्र, यापुढे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. 
 

Web Title: Guardian Minister Bapat will end monopoly in Bhor Municipal Corporati