मृतांच्या नातेवाइकांची पालकमंत्र्यांकडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

हनुमान टेकडी येथे भिंत पडून कुणाल अजय दोडगे या मुलाचा रविवारी मृत्यू झाला होता. सोमवारी पहाटे भांगरवाडी येथे दुमजली घर कोसळून जयप्रकाश जगन्नाथ नायडू यांचा मृत्यू झाला.

लोणावळा : येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत बळी पडलेल्या मृतांच्या नातेवाइकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. 6) भेट घेतली. या वेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, प्रांताधिकारी सुभाष भागडे, मुख्याधिकारी सचिन पवार उपस्थित होते.

हनुमान टेकडी येथे भिंत पडून कुणाल अजय दोडगे या मुलाचा रविवारी मृत्यू झाला होता. सोमवारी पहाटे भांगरवाडी येथे दुमजली घर कोसळून जयप्रकाश जगन्नाथ नायडू यांचा मृत्यू झाला. पाटील यांनी येथील परमार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या घटनेतील जखमी मुलगी नंदिनी हिची भेट घेतली. त्याचबरोबर नायडू कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. भेगडे, राम यांच्या हस्ते कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Chandrakant patil enquires kin of deceased in Lonavala tragedy