वारजे येथे नवं वर्षाची भव्य शोभायात्रा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

वारजे गावाच्या सीमेवर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. तिला आणि हार अपर्ण करून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक पोशाख घातलेली लहान मुले आणि सजवलेला चित्ररथ.

पुणे (वारजे माळवाडी) - हिंदू नववर्ष तथा गुढीपाडव्या निमित्त रविवारी ऐतिहासिक वारजे परिसरात हिंदू नववर्ष सोहळा समिती तर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पर्यंतचे ऐतिहासिक पुरावे मिळाले आहेत. वारजे गावाच्या सीमेवर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. तिला आणि हार अपर्ण करून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक पोशाख घातलेली लहान मुले आणि सजवलेला चित्ररथ. किल्याच्या आकाराचा रथ बनविला होता. यामध्ये शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारत माता अशी अनेक रुपं धारण करून मुले सहभागी झाली होती.

gudhipadwa yatra

या शोभा यात्रेमध्ये स्थानिक गावकरी, नागरिक महिला, पुरुष आणि लहान मुले तसेच सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. पारंपारिक पोशाखामध्ये हातात भगवे ध्वज घेऊन अनेकांनी नववर्षाचे स्वागत केले. या वेळी नागरिकांनी फुले टाकून शोभायात्रेचे स्वागत केले. अकरा वाजता पावशा श्रीगणपती मंदिरात महाआरती करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली. अशा प्रकारे नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

gudhipadwa yatra
 

Web Title: gudhipadwa celebration new year yatra varje malvadi pune