विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन

ज्ञानेश्वर भंडारे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

वाल्हेकरवाडी : आकुर्डीतील डाॅ डी वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात स्पर्धा परिक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन वामन, डी वाय एस पी परीक्षा उत्तीर्ण झालेले दत्तु शेवाळे, सुजीतकुमार क्षीरसागर उपस्थित होते.

वाल्हेकरवाडी : आकुर्डीतील डाॅ डी वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात स्पर्धा परिक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन वामन, डी वाय एस पी परीक्षा उत्तीर्ण झालेले दत्तु शेवाळे, सुजीतकुमार क्षीरसागर उपस्थित होते.

आजच्या या स्पर्धेच्या युगात विदयार्थ्यांचा जास्तीत जास्त कल असणारे क्षेत्र म्हणजेच राज्यसेवा तसेच लोकसेवा आयोगाच्या परिक्षा हा असतो. या परिक्षांची तयारी करत असताना विदयार्थ्य़ांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाविदयालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापणा करण्यात आलेली आहे. यामध्ये या क्षेत्रातील विविध तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातुन विदयार्थ्य़ांना अभ्यास सोयीस्कर व्हावा या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतो.
 
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन नुकतीच राज्यसेवा आयोगाची डी वाय एस पी पदाची परिक्षा पास झालेले दत्तु शेवाळे तसेच सुजीतकुमार क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये विदयार्थ्यांना राज्यसेवा तसेच लोकसेवा आयोगाच्या परिक्षांची पुर्वतयारी कशी करावी. यामध्ये चिकाटी धैर्य आणि अपार कष्ट या गोष्टींची नितांत गरज आहे , असे मत दत्तु शेवाळे यांनी मांडले. याचबरोबर स्वतःचे आयुष्य जगताना ते कसे यशस्वी झाले याची देखील माहीती त्यांनी विदयार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविदयालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक विशाल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक मिनाक्षी गोणारकर यांनी केले तर आभार प्राध्यापक सौम्या यांनी मानले.

Web Title: Guidance on the contest examinations for the students

टॅग्स