सहकारी गृहनिर्माणातला तरुण दिशादर्शक - केदार ध्रुवकुमार कुलकर्णी

जाहिरात
Tuesday, 20 October 2020

केदार जपतोय डीआर कुलकर्णींचा वारसा...

सहकारी गृहरचना संस्था, त्यांचं योग्य परिचालन, व्यवस्थापन यासाठी केदार अगदी योग्य सल्ला देतात. केदार यांचे वडील दिवंगत पत्रकार डी. आर. कुलकर्णी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या अभ्यासातून आणि लिखाणातून आपल्याला परिचित होते. त्यांचाच वारसा केदार अत्यंत निष्ठेनं, तळमळीनं जपताहेत.

छान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं म्हणजेच सोसायटीचं रूप येते. मग आपसूकच नियमही येतात. संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हे नियम. पण काही वेळा माहितीचा अतिरेक किंवा अभाव यामुळं सोसायटीतील रहिवाश्यांमध्ये सर्वकाही आलबेल असतंच असं नाही. सोसायटीचे नियम, अंमलबजावणी याबाबतची माहितीपुस्तिका असते. पण तीही सरकारीच. त्यामुळं सरकारी भाषेतील हे नियम सर्वांनाच कळतात असं नाही. सोसायटीची नियमित स्वच्छता, वीजबिल, पाणीपट्टी, करभरणा, ऑडिट आदी गोष्टी अनिवार्य असतात. या सगळ्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातलं एक सुपरिचित नाव म्हणजे केदार ध्रुवकुमार कुलकर्णी! अवघ्या २८ वर्षाचा हा तरुण. पण केदार यांनी वडिलांबरोबर काम करताना अनुभव गाठीशी बांधल्यानं हा तरुण सहकारी गृहनिर्माण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरतोय. केदारशी साधलेला हा संवाद...

गृहनिर्माण संस्थांशी निगडीत काम का करावंसं वाटलं?

पुण्यासारख्या शहरी भागात ७० टक्के लोक फ्लॅटध्ये राहातात. हे सर्व मध्यमवर्गीय लोक असल्यानं त्यांना अनंत अडचणींना, समस्यांना सामोरं जावं लागतं. एकीकडं माहितीचा अभाव, तर दुसरीकडं अतिरेकही असतो. परंतू मार्गदर्शनाच्या अभावानं या ७० टक्के लोकांचा आवाज फारसा होत नाही. हा अभाव दूर करून मला या लोकांचा आवाज व्हायचंय. शिवाय, बाबांबरोबर (डी. आर.) काम करताना या कामाची आवडही निर्माण झाली. अनेक वर्ष सातत्यानं काम केल्यावर लक्षात आलं की अनेक ठिकाणी नियमांना डावलून कारभार होतोय. वास्तविक सहकारी गृहरचना संस्था, त्यांच्याकडून कररूपी मिळणारा पैसा हे सरकारच्या कमाईचं साधन. तरीही त्यांच्या अडचणी जैसे थेच! ही परिस्थिती बदलण्यासाठी मला काम करायचं आहे.

आपण नेमकं काय आणि कसं मार्गदर्शन करता?

सोसायट्यांचे नियम आता बदललेत. त्याबाबत जागृती करण्यासह कचरा व्यवस्थापन, संस्था व्यवस्थापन, संस्थेअंतर्गत विकासकामं, अंतर्गत रस्ते, सोयीसुविधांचं व्यवस्थापन आदी गोष्टींबाबतही मार्गदर्शन करतो. खूप जुन्या सोसायट्या आहेत. त्यांचे डीम्ड कन्व्हेयन्स, कन्व्हेयन्स, गुंठेवारीच्या समस्या याबाबत मार्गदर्शन करतो. सोसायट्यांमध्ये स्वच्छ भारत अभियान राबवण्यासह सोसायटी आणि सरकार यांच्यामध्ये संवाद घडवून आणणे आदी गोष्टीतही पुढाकार घेऊन करतो.

सध्या पुण्यात रिडेव्हलपमेंट (पुनर्विकास) हा महत्त्वाचा विषय आहे. पण यात अनेकदा दिरंगाई, वाद होतो. यात आपण कसा मार्ग काढता?

पुनर्विकास हा सध्या पुण्यासारख्या शहरात महत्त्वाचा विषय आहे कारण बहुतांश पुणेकरांना राहातो ती जागा सोडायची नसते. मुलं मोठी झालेली असल्यानं गरजा वाढतात. तेव्हा नवीन, मोठं घर घेणं मध्यमवर्गीयांना विचारानंही शक्य नसतं. पण मोठं घर तर हवं असतं. त्यावर उपाय तिथंच पुनर्विकास करणं. पुनर्विकास करताना जागा वाढवून मिळते. म्हणजे दोन खोल्यांची जागा असेल तर तीन खोल्या मिळतात. शिवाय, आहे तिथंच काहीही न करता आपल्याला हक्काचं मोठं घर मिळू शकतं. या जुन्या इमारतींच्या जागी पुनर्विकासाची योजना अगदी सुलभ आणि सोप्या पद्धतीनं राबविण्यासाठी 'वेस्टर्न फिल्ड्स रियल्टी' (www.westernfieldsreality.com) ही आमची प्रिडेव्हलपमेंट अड्वायझरी फर्म काम करते. त्यात कायद्यापासून ते आर्किटेक्चरल, टेंडरपासून ते विकसक नेमण्यापर्यंतची सर्व कामं केली जातात. सोसायटीचं कन्व्हेयन्स, पुनर्विकास होऊ शकेल का याचा अहवाल, निविदांची प्रक्रिया, प्रकल्प व्यवस्थापन, सल्ला व मार्गदर्शन आदी यामध्ये समाविष्ट आहेत. आजवर ३२ सोसायट्यांच्या पुनर्विकासात मार्गदर्शन केले आहे.

'वास्तुकुल'ची संकल्पना काय आहे?

'वास्तुकुल' ही एक पुनर्विकास कंपनी आहे. केदार कुलकर्णी (मी),  कुणाल कुलकर्णी, मीनाक्षी द्रविड-कुलकर्णी आणि देवेंद्र कुलकर्णी या चार तरुण 'कुलकर्णीं'नी एकत्र येऊन ती स्थापन केली आहे. त्यात मी प्रि-रिडेव्हलपमेंट कम्प्लायन्सेस व फायनान्स पाहातो. 'वेस्टर्न फिल्ड्स रियल्टी'अंतर्गत विकसनपूर्व सर्व शंका-निरसन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. देवेंद्र कन्स्ट्रक्शन हेड असून, त्याच्याकडं नामांकित विकासकाकडचा अनुभव आहे. मीनाक्षी आर्किटेक्ट असून, तिच्याकडं लॉस एन्जेलिसमध्ये डिस्नेवर्ल्ड डिझाईन केलेल्या फ्रँक गेहरी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आहे. कुणाल डिझायनर आहे. त्यामुळं 'वास्तुकुल'च्या डिझाईनमध्ये लोकल-ग्लोबल टच असतो. सोसायटीकडून प्रस्ताव आल्यानंतर त्यांना 'वास्तुकुल'चं पत्र जातं. पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अपेक्षा, मिळणाऱ्या जागेबाबत स्पष्टता आणली जाते. ऑफर मान्य झाल्यास सविस्तर प्रेझेंटेशन देतो. टेक्निकल, आर्किटेक्चरल, डिझाईन, फायनान्स आणि कायदेशीर बाबींची स्पष्टता देतो. वैशिष्ट्य असं की, एखादी जागा विकसन करायला घेताना सर्व परवानग्या आधीच घेतल्या जातात. त्याचं सँक्शन लेटर सोसायटीच्या नावानं येतं. त्यामुळं भविष्यात काही अडचण आली, अघटीत घडलं, तरी साईट थांबत नाही. निबंधकाकडे सोसायटीच्या नावानं नोंदणी होत असल्यानं सोसायटीचं नुकसान होत नाही. सर्व कायदेशीर गोष्टी सुरळीत करण्यासाठीही कंपनी सहकार्य करते.

पुनर्विकास प्रकल्पात लोकांचा विश्वास कसा संपादन करता?

प्लान सँक्शन झाला की रेरा नोंदणीही होते. त्यामुळं रहिवाशांना काहीच त्रास नाही. बांधकामाचा दर्जा कळण्यासाठी साईट व्हिजिट होतात. रेरामुळं अनेक गोष्टी ग्राहकांच्या बाजूनं आहेत. शिवाय, आम्ही ३६ महिन्यांच्या कामाच्या वेळापत्रकाचं डॉसिअर देतो. त्यात प्रत्येक साहित्याच्या व्हेंडरची नावं असतात. सोसायटीचे दोन सदस्य क्वालिटी अनालिस्ट म्हणून नेमतो. ते प्रत्येक स्लॅबची पाहाणी करतात. त्याव्यतिरिक्त बांधकामाचे सर्व नियम पाळून आणि पर्यावरणाचा विचार करून हे बांधकाम होते. त्याला आम्ही टेरेस गार्डनची जोड देतो. नवीन सोसायटी म्हणून कॉर्पसही देऊ करतो. 'वास्तुकुल'ला विकसनाच्या क्षेत्रात बेंचमार्क तयार करायचा आहे, म्हणून स्पष्टता आणि गुणवत्ता या घटकांवर आम्ही भर देतो. त्यामुळंच लोक विश्वासानं आपली जागा पुनर्विकासासाठी देताहेत.

दिवंगत पत्रकार डी. आर. कुलकर्णी गृहनिर्माण प्रशिक्षण योजना काय आहे?

पुणे महानगरपालिकेनं वडिलांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या सातत्यपूर्ण कामाची दखल घेत ही प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. पुण्यातील सहकारी गृहरचना संस्थांमध्ये जागृती करण्याचा पालिकेचा हा उद्देश आहे. पुण्यात २० हजाराहून अधिक गृहनिर्माण संस्था आहेत, त्यांना सोसायटी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सौर उर्जा, कायदेशीर बाजू विषयी माहिती देणे तसेच जुन्या इमारतींना पुनर्विकासाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पालिका हे प्रयत्न करते आहेत. या सर्व योजनेचा प्रकल्प समन्वयक म्हणून मी काम पाहातो आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर योजनेंतर्गत वॉर्डनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत.

दिवंगत पत्रकार डी. आर. कुलकर्णी फाऊंडेशनविषयी सांगाल.

वडिलांनी सहकारी गृहरचना संस्था, जलव्यवस्थापन यामध्ये खूप काम केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे लावणे आणि बगिचांचा विकास कऱणे आदींविषयी त्यांना आस्था होती, फाऊंडेशनच्या माध्यमातून मी हेच काम पुढे नेणार आहे. शिवाय त्यांच्या स्मरणार्थ पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आम्ही राबवणार आहोत.

तरूणांना या क्षेत्रात संधी आहेत का?

सध्या सोसायट्यात काम करणारी अधिक मंडळी ही ज्येष्ठच आहेत. पण नवीन नियम, कायदे याचं ज्ञान तरूणांनी घेत पुढाकार घेतला, तर फार मोठ्या संधी आहेत. पुढील चार वर्षांत वेस्टर्न फिल्ड्स रियल्टीला भारतातील स्टॉक मार्केट लिस्टेड कंपनी करण्याचं माझं ध्येय आहे. www.westernfieldsreality.com या क्षेत्रात मी 'यंगेस्ट एन्टरप्रेन्यॉर' आहे. हे क्षेत्र तरूणांना खुणावत असून, खूप मोठा वर्ग यात सामावला जात असल्यानं संधीही मुबलक आहेत.

केदारची ठळक वैशिष्ट्ये

- वडील डीआर कुलकर्णींचा वारसा जपतोय.

- आज घडीला या क्षेत्रात काम करणारा सर्वात तरुण व्यक्ती.

- महापालिकेच्या दिवंगत पत्रकार डीआर कुलकर्णी गृहनिर्माण प्रशिक्षण योजनेचा प्रमुख समन्वयक

- ७० टक्के फ्लॅटधारक मध्यमवर्गीयांचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न. 

- दिवंगत पत्रकार डीआर कुलकर्णी फाउंडेशनचा संस्थापक

केदारची व्यक्तिगत माहिती:

 केदार ध्रुवकुमार (डीआर) कुलकर्णी. 

 शिक्षण : बीकॉम, एमकॉम, वय : २८ वर्षे.

मोबाईल : ९७६७२३०६६०

ईमेल : kulkakedar@gmail.com, reach@westernfieldsreality.com

कंपन्या : वास्तुकुल, गो एव्हरग्रीन, वेस्टर्न फिल्ड्स रियल्टी

Websiteswww.westernfieldsreality.comwww.vastukul.co\

केदार जपतोय डीआर कुलकर्णींचा वारसा...

सहकारी गृहरचना संस्था, त्यांचं योग्य परिचालन, व्यवस्थापन यासाठी केदार अगदी योग्य सल्ला देतात. केदार यांचे वडील दिवंगत पत्रकार डी. आर. कुलकर्णी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या अभ्यासातून आणि लिखाणातून आपल्याला परिचित होते. त्यांचाच वारसा केदार अत्यंत निष्ठेनं, तळमळीनं जपताहेत. केदार यांचं शिक्षण वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी असं असलं तरी वडिलांबरोबर राहून त्यांनी अनेक रहिवाशी सोसायट्यांना याचं मार्गदर्शन केलंय. अजूनही ते कार्य अव्याहत सुरूच आहे. अर्थातच बदलत्या काळाबरोबर राहाण्याचा वसा त्यांनी सोडलेला नाही. गेली अनेक वर्ष केदार या क्षेत्रात काम करताहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidance to housing socities special article by Kedar Dhruvakumar Kulkarni