शिक्षण, करिअर निवडीचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे - शिक्षण व पदवी हे तर महत्त्वाचे; पण पर्याय कोणता निवडावा असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडतो. भविष्यातल्या शिक्षणाच्या संधी, बदललेले अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, करियरच्या विविध संधी आणि तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन म्हणून 

त्यावर एक उपाय आणि तोही एकाच छताखाली. त्यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने १६ मे ते १६ जून दरम्यान राज्यातल्या विविध शहरांमध्ये ‘एज्युस्पायर’ या ॲडमिशन एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. 

‘यिन’ने महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजिलेल्या ‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने हा एक्‍स्पो होणार आहे. मुंबई, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव या १२ शहरांमध्ये १६ मे ते १६ जून दरम्यान या परिषदा होणार आहेत. स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी एक्‍स्पोची मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, पुणे, सिमॅसिस इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी लर्निंग सेंटर (एसआयआयएलसी) आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स, पुणे सहप्रायोजक आहेत. राज्याच्या विविध भागांमधील नामांकित संस्थांचा सहभाग, त्याचबरोबर शिक्षण आणि करिअरसंबंधी मोफत मार्गदर्शन हे या एक्‍स्पोचे वैशिष्ट्य आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा
या एक्‍स्पोच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या एक्‍स्पिरियन्स झोनमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेता येणार आहे. रोबो, नॅनो ड्रोन, व्हर्च्युअल रिॲलिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयआरव्हीआर आदी तंत्रांचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी इंडिया फर्स्ट रोबोटिक्‍स, डिजिटल आर्ट व्हीआरई, माइंड मॅटर्स, खुशी ॲडव्हर्टायझिंग यांचे सहकार्य लाभले आहे.

उच्च गुणवत्ताधारक, आत्मनिर्भर व सामाजिकदृष्ट्या जबाबदार असलेला युवक निर्माण होणे हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. युवकांच्या मनातील सर्जनशील कल्पनांना चालना मिळण्यासाठी समर यूथ समिटसारखे उत्तम व्यासपीठ ‘सकाळ’ व ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ने उपलब्ध करून दिले आहेत व त्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मनातील शंका व प्रश्‍नांचे समाधान करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
- डॉ. सोमनाथ पाटील,  सचिव, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटी

राष्ट्रासाठी उत्तम अधिकारी हवेत म्हणूनच युवा वर्गात अधिकारी होण्याचे आकर्षण वाढत आहे. समिटच्या माध्यमातून युवकांना यासाठी मार्गदर्शन करण्यास स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी उत्सुक आहे.
- मनीषा पवार, संचालिका, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी

अधिक माहितीसाठी संपर्क  
पुणे व जिल्हा -  ९८८१५०४४९२

Web Title: Guidance for learning career selection in one place