ओला व सुका कचरा जिरवण्याबाबत सोसायटी प्रमुखांना मार्गदर्शन

sanghavi
sanghavi

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती कचरा ओला व सुका कचरा अलगीकरण व सोसायटी आवारातच ओला व सुका कचरा अलगीकरण करून जिरविण्याबाबत जुनी सांगवी प्रभाग क्रं ३२ व ३१ मधील सोसायटी प्रमुख व नागरीकांना आरोग्यविभाच्या वतीने गुरूवार ता.६ माहीती देण्यात आली. दिंवसे दिवस वाढणारी कच-याची समस्या यातुन मार्ग काढण्यासाठी सोसायट्यांना स्वत:चा कचरा स्वत: व्यवस्थापन करण्यासाठी जैविक व यांत्रिकी पद्धतीने कच-याची व्यवस्था करण्याबाबत आरोग्य निरिक्षक संजय मानमोडे यांनी उपस्थितांना माहिती दिली.क्षेत्रिय अधिकारी सौ.आशा राऊत,मुख्य आरोग्य निरिक्षक अजय जाधव,सहाय्यक आरोग्य निरिक्षक ज्ञानेश्वर सासवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओला व सुका कचरा जिरविण्याबात मार्गदर्शन बैठक सांगवी येथे घेण्यात आली.कंपोस्टिंग मशीनद्वारे सोसायट्यांनी यांत्रिकी व जैविक पद्धतीने सोसायट्यांचा कचरा सोसायट्यामधुन जिरवावा अशी माहिती देण्यात आली. सध्या ओला व सुका कचरा नागरीकांकडुन अलगीकरण करून येत नसल्याने डंपीग ग्राऊंडवर याचे अलगीकरण करावे लागते यात मनुष्यबळ,वेळ व ईतर समस्यांना तोंड द्यावे लागते.सोसायट्यांनी पुढाकार घेवुन स्वताचा कचरा स्वता:च्या आवारात कंपोस्टिंग मशीनद्वारे जिरविल्यास भविष्यात कचरा समस्या राहणार नसल्याची मते यावेळी मांडण्यात आली. दोन ते पाच लाख रूपये पर्यंतच्या किमतीच्या मोठ्या क्षमतेच्या या मशीन उपलब्ध आहेत. यातुन खत निर्मिती करून कचरा समस्येला चांगला पर्याय उपलब्ध होवु शकतो अशी मतमतांतरे मांडण्यात आली.यावेळी अर्थकेअर कंपनीचे प्रतिनिधी विनय मेहता, रविकिरण,सहाय्यक कर्मचारी रामदास मोझे,वरूण कांबळे यांच्यासह सोसायटी प्रमुख,व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सध्या या प्रभागातील बँसीलीओ या सोसायटीने मशीन बसविण्यास होकार दिला आहे.
विनय मेहता-प्रतिनिधी अर्थकेअर कंपनी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com